Headlines

…तर अजितदादा… माझे काका आपल्यात असते; रोहित पवार यांनी केला सर्वात मोठा गंभीर आरोप

…तर अजितदादा… माझे काका आपल्यात असते; रोहित पवार यांनी केला सर्वात मोठा गंभीर आरोप
…तर अजितदादा… माझे काका आपल्यात असते; रोहित पवार यांनी केला सर्वात मोठा गंभीर आरोप


राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारी रोजी विमान अपघातात आकस्मिक निधन झाले. त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. अजितदादा यांच्या निधनानंतर आता विमानाचे ब्लॅकबॉक्स ताब्यात घेण्यात आला आहे.या अपघाताला १३ दिवस झाले आहेत. या अपघातानंतर १० तारखेला आपण पत्रकार परिषद घेणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी असे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी आज दृकश्राव्य माध्यमावर आधारित प्रेझेंटेशन सादर करीत सरकारला अनेक सवाल केले आहेत.

विमानासाठीचे एक एप आहे. हे एक युनिव्हर्सल एप आहे. त्यात गेल्यावर किती वर्षापूर्वीचं विमान होतं, तर १६ वर्षापूर्वीचं हे विमान आहे. २५ आणि २६ ला हे विमान सुरतला जाऊन आलं होते. कंपनीचे मालक सिंग म्हणाले, विमान चांगल्या स्थितीत होते. मेंटेन होते. वैमानिक अनुभवी आहे. अपघात व्हिजिबिलीटीमुळे झाल्याची शक्यता आहे. मात्र या स्थानिक गावातील लोकांचे म्हणणे आहे की विमानाचा आवाज विचित्र येत होता. रोज विमान यायचे. पण या विमानाचा आवाज वेगळाच येत होता असे एका महिलेने सांगितल्याचे रोहित पवार यावेळी म्हणाले. या गावाच्यावरून विमान गेलं तेव्हा आवाज वेगळा येत होता. म्हणजे मेंटेनन्समध्ये प्रॉब्लेम असेल.
विमान आलं टिल झालं आणि पडलं. सीसीटीव्ही फुटेजमधून दिसलं. हे सीसीटीव्ही फुटेज बाहेर आले नसतं तर या अपघाताबद्दल मोघम बोललं गेलं असते असेही रोहीत पवार यावेळी म्हणाले.

अपघात झाल्यानंतर १३-१४ दिवसात काहीच झालेले नाही. तर फक्त सीसीटीव्ही फुटेज बाहेर आले आहे.त्यामुळे आम्हाला हे पडलेले प्रश्न आहेत.चौकशी मॅन्युप्युलेट केली जाऊ शकतात असाही आरोप त्यांनी केला आहे. या विमानाचा २०२३ ला विमानाचा अपघात झाला होता. आयलेस सिस्टीम बारामतीत नसल्याने अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. पण मोठमोठी विमाने लँड होत होती. मुंबईत तर आयलेस सिस्टिम होती. तिथे या विमानाचा कसा अपघात झाला. व्हिजीबिलिटीवर कसं ढकलून देता येईल. काही तरी झाले असेल असे रोहीत पवार यावेळी म्हणाले.

तर हा माझे काका आज आपल्यात असते

मुंबई विमानतळावर २०२३ ला अपघात झाला. त्याचा आतापर्यंत रिपोर्ट आला नाही. अजितदादांच्या अपघात झाल्यावर बातम्या झाल्या. डीजीसीला जाग आली. आणि सप्टेंबरमध्ये 2023च्या अपघाताचा रिपोर्ट देणार असल्याचे म्हटलं. यावरून व्हिएसआरचं त्यावर नियंत्रण आहे. हा रिपोर्टच आला नाही. त्यामुळे अपघात कसा झाला ते कळलं नाही. रिपोर्ट दाबला गेला. तो दाबला नसता तर अजितदादा, माझे काका आज आपल्यात असते असेही भावूक होत रोहित पवार यावेळी म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *