
इराण आणि अमेरिका युद्ध सुरू आहे. मात्र, या युद्धात जगातील अनेक देश होरपळत आहेत. कुठे गॅसची टंचाई तर कुठे कच्च्या तेलाचे मोठे संकट आहे. जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती गगणाला पोहोचल्या आहेत. महागाईचे थेट संकट आहे. इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेत युद्ध सुरू आहे, ही वस्तुस्थिती असली तरीही युद्धाचा फटका थेटपणे अनेक देशांना बसत आहे. होर्मुज खाडी बंद करण्यात आल्याने तेलाची निर्यात आणि आयात थांबली आहे. शिवाय युद्धात तेल रिफायनरी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले केले जात असल्याने जगा पुढे ऊर्जेचे थेटपणे संकट आहे. युद्ध लवकरात लवकर थांबवावे, अशी मागणी केली जात आहे. ब्रिटनही युद्धात उतरल्याचे संकेत असल्याने एका विनाशकारी युद्धाला सुरूवात झाल्याचे दिसत आहे. परमाणू ठिकाणांच्या आसपास हल्ले केले जात आहेत. यादरम्यानच आता पाकिस्तानमधून भारताबद्दल खळबळ उडवणारे विधान करण्यात आले.
पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी भारताला थेट मोठी धमकी दिली आहे. बासित यांनी म्हटले की, विदेशात जी स्थिती आहे, त्यावरून भारत पाकिस्तानला निशाणा बनू शकतो. पाकिस्तानमधील एका न्यूज चॅनलमधील चर्चेत बोलताना अब्दुल बासित यांनी म्हटले की, अमेरिकेने जर पाकिस्तानवर हल्ला केला तर काहीही मागचा पुढचा विचार न करता पाकिस्तान थेट मुंबई आणि दिल्लीवर हल्ला करेल.
आम्ही पण असे तसे अजिबात सोडणार नाहीत. पुढे बघता येईल काय काय होते आणि काय नाही ते… बासित यांनी हे विधान सर्वात वाईट परिस्थिती आल्यावर केले जाईल, असे म्हटले आहे. मात्र, बासित यांनी केलेल्या या विधानाने मोठी खळबळ उडाली. बासित यांनी मुंबई आणि दिल्लीचे थेट नाव घेतल्याने वाद वाढला आहे. या चर्चेदरम्यानच बासित वारंवार सांगत होते की, ही स्थिती येणे शक्यच नाही.
सध्याच्या घडीला असे काही घडणार नाही पण जर घडले तर आम्हीही सोडणार नाही, असे त्यांनी म्हटले. जर आमच्याकडे कोणी वाईट नजरेने बघितले तर पाकिस्तानला वाटेल तिथे तो भारतात हल्ला करू शकतो. सध्याच्या परिस्थितीला असे काही घडावे, असे भारतालाही वाटत नसल्याचे बासित यांनी म्हटले. बासित यांनी 2014 ते 2017 च्या काळात दिल्लीमध्ये पाकिस्तानचे सर्वोच्च राजनयिक म्हणून काम पाहिले आहे. अफगाणिस्तानसोबतच्या तणावाबद्दलही त्यांनी मोठे भाष्य केले.