Headlines

तुमच्या रोजच्या आहारातील ‘हे’ पदार्थ शरीराला आतून करतात कमजोर, ताबडतोब थांबवा सेवन

तुमच्या रोजच्या आहारातील ‘हे’ पदार्थ शरीराला आतून करतात कमजोर, ताबडतोब थांबवा सेवन
तुमच्या रोजच्या आहारातील ‘हे’ पदार्थ शरीराला आतून करतात कमजोर, ताबडतोब थांबवा सेवन


आहारातील ‘हे’ पदार्थ शरीराला आतून करतात कमजोरImage Credit source: Instagram

आपण जे खातो त्यावरच आपली शक्ती, ऊर्जा आणि आरोग्य अवलंबून असते. पण कधीकधी आपल्या जेवणात असे पदार्थ असतात जे हळूहळू आपल्या शरीरातील ऊर्जा कमी करतात. त्यासोबतच आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवण्यास सुरूवात होते. त्यामुळे कोणते पदार्थ आपल्याला शरीराला नुकसान पोहोचवत आहेत आणि कोणते पदार्थ खाणे टाळले पाहिजेत हे आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.

पॅकेज्ड फूड आणि इन्स्टंट फूडचा वाढता ट्रेंड

आजकाल पॅकेज केलेले स्नॅक्स, इन्स्टंट नूडल्स आणि रेडी-टू-इट पदार्थांचे सेवन वाढत आहे. हे पदार्थ चवीला चविष्ट असले तरी त्यांमध्ये पोषणमूल्ये कमी आणि प्रिझर्व्हेटिव्ह्ज व अतिरिक्त मीठ यांसारखे धोकादायक घटक असतात. त्यामुळ या पदार्थांचे नियमित सेवन केल्याने शरीर हळूहळू कमजोर होऊ शकते.

अतिरिक्त साखरेमुळे शरीरातील समस्या वाढू शकतात

आरोग्याच्या बाबतीत दुसरी मोठी समस्या म्हणजे साखरेचे अतिरिक्त सेवन. मिठाई, केक, पेस्ट्री आणि थंड पेयं यांसारखे गोड पदार्थ तात्काळ ऊर्जा देतात, पण ही ऊर्जा फार काळ टिकत नाही. यामुळे थकवा आणि सुस्ती येते. तुमच्या आहारात जर असे गोड पदार्थ आणि बाहेरील पेयांचे प्रमाण जास्त असल्यास तुम्हाला लठ्ठपणा, मधुमेह आणि इतर आजार होण्याची शक्यता अधिक असते.

मैदा आणि जंक फूड शरीराचे नुकसान करतात

त्याचप्रमाणे रिफाइंड पिठापासून जसे की मैद्यापासून बनवलेले पदार्थ देखील आपल्या आरोग्यासाठी नुकसानकारक असतात. पांढरा ब्रेड, बिस्किटे आणि पेस्ट्रीमध्ये फायबरची कमतरता असते, ज्यामुळे पचनसंस्था कमकुवत होते आणि शरीराला आवश्यक पोषक तत्वांची कमतरता भासते. याशिवाय, तळलेले आणि जंक फूडमध्ये ट्रान्स फॅटचे प्रमाण जास्त असते आणि हे पदार्थ हृदय आणि शरीर या दोन्हींसाठी धोकादायक ठरू शकतात.

अतिरिक्त मीठाच्या सेवनानेही धोका वाढू शकतो

जास्त मीठ खाणे देखील आरोग्यासाठी धोकादायक असते. कारण मीठाचे प्रमाण शरीरात झाल्यास रक्तदाब वाढू शकतो आणि शरीरात पाणी साठू शकते.

त्यामुळे आपल्या आहारात संतुलन आणि पोषण वाढवणे महत्त्वाचे आहे. आहारात ताज्या भाज्या, फळे, कडधान्ये, संपूर्ण धान्य आणि घरगुती जेवणाचा समावेश करा. या गोष्टी केवळ शरीराला शक्तीच देत नाहीत, तर आजारांपासून संरक्षणही करतात. शिवाय तुम्हाला जर पटकन काहीतरी खायचे असेल, तर तुम्ही भाजलेले चणे, घरी बनवलेले पोहे किंवा उपमा यांसारखे आरोग्यदायी पर्याय निवडू शकता. भरपूर पाणी पिणे आणि नियमित वेळी जेवणे हे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *