
जानेवारी 2024 मध्ये सार्वजनिक करण्यात आलेल्या न्यायालयीन कागदपत्रांमुळे या प्रकरणाला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे वळण मिळाले आहे. या कागदपत्रांमध्ये एपस्टीनवर आरोप करणाऱ्या पीडित महिला, त्याचे कर्मचारी, तसेच व्यावसायिक आणि सामाजिक वर्तुळातील अनेक व्यक्तींची नावे समोर आली आहेत. या अनेकांनी एपस्टीनच्या गैरकृत्यांबाबत जबाब दिले आहेत. आरोपानुसार, एपस्टीनने मॅनहॅटन, फ्लोरिडातील पाम बीच आणि सेंट थॉमसजवळील आपल्या खासगी बेटावर अल्पवयीन मुलींना नेऊन त्यांचे लैंगिक शोषण केले.