Headlines

त्या सॉफ्ट टार्गेट होत्या, खरातचे खरे भक्त तर… संजय राऊतांचा गंभीर आरोप

त्या सॉफ्ट टार्गेट होत्या, खरातचे खरे भक्त तर… संजय राऊतांचा गंभीर आरोप
त्या सॉफ्ट टार्गेट होत्या, खरातचे खरे भक्त तर… संजय राऊतांचा गंभीर आरोप


नाशिकमध्ये महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणी अटकेत असलेला वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरातमुळे सध्या राज्यातील राजकारण तापले आहेत. त्यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकार आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. या प्रकरणात अडकलेले भक्त मंत्री नेमके कोण? असा सवाल करत राऊतांनी अनेक खळबळजनक दावे केले.

संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मंत्रिमंडळातील ९ माजी मंत्री आणि काही विद्यमान मंत्री या ढोंगी बाबाचे कट्टर समर्थक आहेत. या सर्वांची चौकशी करून त्यांना सहआरोपी करण्याची मागणी राऊतांनी केली आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

मंत्रिमंडळातील साधारण ९ माजी मंत्री आणि काही विद्यमान मंत्री या भोंदूबाबाचे कट्टर समर्थक आहेत. या सर्वांना खरातच्या काळ्या कर्तृत्वाची पूर्ण कल्पना होती. तरीही त्यांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. केवळ राजकारण करण्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेतला गेला, कारण त्या सॉफ्ट टार्गेट होत्या. मात्र, खरातला राजाश्रय देणारे लोक आजही मंत्रिमंडळात बसलेले आहेत. या सर्व मंत्र्यांची चौकशी करून त्यांना या प्रकरणात सहआरोपी केले पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.

यावेळी संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवरही टीका केली. महाराष्ट्रात शाहू, फुले, आंबेडकर, संत गाडगे महाराज, प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचाराचे आपण लोक आहेत. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जे आहेत, त्यांची भूमिका कायमच अशाप्रकारच्या लोकांना उत्तेजन देण्याची राहिली आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी अनेक बुवा त्यांनी राजकारणात आणले. त्यांनी वारकरी सांप्रदायला राजकारणात ओढलं. काय सांगाव आजचे खरात बाबा आहेत त्यांना भाजपमध्येही शुद्ध करुन घेतलं जाईल. जे मंत्री किंवा इतर लोकांचीहीची चौकशी व्हायला पाहिजे. तुम्ही मंत्री असतानाही तुमचा विश्वास कसा ढेपाळला की तुम्हाला याचा आधार घ्यावा लागला, असा सवालही संजय राऊतांनी केला.

त्यांना सर्व गुन्ह्यांची कल्पना

अशोक खरातला पाणी कधी दिलं, कोणत्या साली दिलं, कोणत्या कॅबिनेटने पाणी दिलं, कॅबिनेटची एक उपसमिती होती, त्याने पाणी दिलं, अशी माझी माहिती आहे. तुम्ही एका राज्याचे मुख्यमंत्री आहात, त्यामुळे तुमच्याकडून अत्यंत जबाबदार विधान या संवेदनशील प्रश्नावर उत्तर येणं गरजेचे आहेत. तुम्हाला कोणाला तरी वाचवायचं, त्यामुळे आधीच्या सरकारने हे केलंय हे अतिशय थोतांड आहे. तुमच्या मंत्रिमंडळातील कोणते मंत्री सातत्याने खरात बाबाकडे जात होते, त्यांना सर्व गुन्ह्यांची कल्पना होती. तुमच्या मित्रपक्षातील आमदार खासदार तिथे जात होते, ते त्यांना बळ देत होते, असं गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.

अशोक खरातचे फोटो देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील तर पाटावर बसून विधी करतात. मी त्यात जात नाही. पण मी इतकंच म्हणालो की तुमच्य्या मंत्रिमंडळातील भक्तगण आहे त्यांच्याविषयी तुमची भूमिका काय, या सर्व मंत्र्‍यांसाठी एक शिबीर करा. देवेंद्र फडणवीस यात तुम्ही राजकारण करत आहात. ते करु नका, असेही संजय राऊत म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *