दिग्दर्शक पॅडेड ब्रा घालायला सांगतो आणि… तापसी पन्नू कडून इंडस्ट्रीची पोलखोल

दिग्दर्शक पॅडेड ब्रा घालायला सांगतो आणि… तापसी पन्नू कडून इंडस्ट्रीची पोलखोल
दिग्दर्शक पॅडेड ब्रा घालायला सांगतो आणि… तापसी पन्नू कडून इंडस्ट्रीची पोलखोल


Taapsee Pannu On Directors Demand: अभिनेत्री कायम इंडस्ट्रीची काळी बाजू जगासमोर आणतात. अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) हिने देखील इंडस्ट्रीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सांगायचं झालं तर, साउथ पासून बॉलिवूडमध्ये स्वतःची भक्कम ओळख निर्माण करणारी तापसी हिने नुकताच झालेल्या एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. मुलाखतीत तापसी हिने साउथ सिने विश्वातील काळी बाजू जगासमोर आणली आहे. तापसी हिने सांगितल्याप्रमाणे साउथ सिनेविश्वातील दिग्दर्शक अभिनेत्रींना पॅडेड ब्रा घालण्यासाठी सांगतात. अशा परिस्थितीत अभिनेत्रींना असहज परिस्थितीचा समना करावा लागतो…

साउथ सिनेविश्वातील दिग्दर्शक अशा मागण्या करतात ज्यामुळे अभिनेत्रांना प्रचंड लाज वाटते. अभिनेत्रीला विचारण्यात आलं की, भोजपुरी आणि साउथ सिनेमातील गाण्यात अभिनेत्रींचं पोट आणि नाभी का दाखवली जाते? यावर तापसी म्हणते, ‘खरंतर हा ट्रेंड समजण्याचा मी खूप प्रयत्न केला. साउथच्या सिनेमांमध्ये नाभीवर तर, बॉलिवूडमध्ये क्लिव्हेजवर अधिक लक्ष दिलं जातं… ‘

‘साउथमध्ये तर कधीकधी पॅडेड ब्रा घालण्यासाठी देखील सांगितलं जातं… पण दिग्दर्शक असं सेटवर थेट बोलत नाही. कारण त्याठिकाणी फार कमी महिला उपस्थित असतात. दिग्दर्शक सहाय्यक दिग्दर्शकाला सांगतो, त्यानंतर सहाय्यक दिग्दर्शक स्टायलिंग टीमला सांगतो. अशात एखादी मुलगी येते आणि अभिनेत्री पॅडेड ब्रा घालण्यास सांगते…’

पुढे तापसी म्हणते, ‘विचार करा हे सर्व किती लाजीरवाणं आहे… जेव्हा मध्येच गाण्याचं शुटिंग थांबवलं जातं आणि अभिनेत्रीला पॅडेड ब्रा घालून येण्यास सांगितल जातं… सिनेमा तयार करत असताना कायम मोठ्या पडद्यावर अभिनेत्रींचे काही बॉडी पार्ट हायलाईट करतात… त्यांना असं वाटतं की, प्रेक्षकांना असं आवडेल…’ असं देखील तापसी म्हणाली आहे.

सांगायचं झालं तर, तापसी सध्या ‘अस्सी’ सिनेमामुळे चर्चेत आहे. 20 फेब्रुवारी रोजी सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. दिग्दर्शत अनुभव सिन्हा दिग्दर्शित सिनेमा एक कोर्टरुम ड्रामा आहे.. सिनेमाला बॉक्स ऑफिसवर संमिश्र प्रतिसाद मिळत आहे… तापसी हिने अनुभव यांच्या ‘आर्टिकल 15’ आणि  ‘मुल्क’ सिनेमात देखील महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते.  सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *