नवी मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन लागू करण्यासंबंधी केलेल्या दिरंगाई बद्दल राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन आयुक्तांसॊबत चर्चा करून विषय लवकरात लवकर विषय मार्गी लावण्यास सांगितले.
आज दिनांक 02/09/2021 रोजी महापालिका आयुक्त यांची भेट घेऊन कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन कसे लागू करावे व त्याची वेतन रचना कशी असावी त्या संबधी सर्व माहिती राष्ट्रवादी जनरल कामगार युनियन आयुक्तांना सादर केली.
नवी मुंबई महानगरपालिकेने 2007 साली सर्व कंत्राटी कामगारांना महाराष्ट्र कॉन्ट्रॅक्ट लेबर( रेग्युलेशन ऍण्ड abolition ) ऍक्ट 1970 नुसार कायम कामगारांना मिळणाऱ्या वेतनानुसार समान काम समान वेतन लागू केले होते. त्याच वेतन पध्दतीचा नुसार वेतन लागू केले तर कामगाराच्या पगारात 9 ते 10 हजार रुपयांची वेतन वाढ होईल.हा कामगाराच्या दृष्टीने कल्याणकारी निर्णय आहे. त्यामुळे कामगारांना 2007 ला ज्या नियमाचा वापर करून समान काम समान वेतन लागू केले होते. त्या नुसार सर्व कामगारांना समान काम समान वेतन लागू करावे अशी मागणी राष्ट्रवादी जनरल कामगार युनियन ने केली आहे. आयुक्तांनी सांगितले लवकरात लवकर सदर प्रस्थावाची अंमलबजावणी करून समान काम समान वेतन लागू करण्यात येईल.
मा आमदार कामगार नेते शशिकांत शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार व उपाध्यक्ष विठ्ठल गोळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व सदर मीटिंग मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई कार्याध्यक्ष नितीन चव्हाण साहेब ,राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी विशाल भिलारे, संदीप मोहिते, व कामगार युनियन पदाधिकारी संजय सुतार,चंद्रकांत चिकने,अजय सुपेकर, राज कदम,प्रसाद कोळी,सुभाष ठाकूर,अनिल तांडेल,सत्यम वेंगुर्लेकर, ललित भोईर, प्रसाद सुतार उपस्थित होते. सर्व कामगारांनी राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन चे सभासद होऊन युनियन ला समान काम समान वेतन लागू करण्यासाठी अजून बळकटी द्या.