
नागपूर जिल्ह्यातील एसबीएल कंपनीत भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटात 16 कामगारांना आपला जीव गमवावा लागला असून, 20 ते 25 जण जखमी झाले आहेत. डिटोनेटर बनवण्याच्या प्रक्रियेदरम्यान हा अपघात झाल्याचे वृत्त आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एसबीएल ही स्फोटके आणि डिटोनेटर बनवणारी कंपनी आहे. धक्कादायक बाब म्हणजे, काही दिवसांपूर्वीही या कंपनीत स्फोट झाल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे कंपनीतील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घटनास्थळी बचाव कार्य सुरू असून, जेसीबीच्या साहाय्याने ढिगारा बाजूला करण्याचे काम सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.