
दिग्गज अभिनेते नाना पाटेकर फक्त त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतात. अभिनेत्री मनिषा कोईराला हिच्यासोबत असलेल्या नाना पाटेकर यांच्या नात्याच्या चर्चा आजही चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. नाना पाटेकर आणि मनिषा यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली. नाना पाटेकर विवाहित असताना मनिषा हिच्यासोबत त्यांच्या संबंधांनी चर्चांनी उधाण आलेलं. पण तेव्हाच अन्य एका अभिनेत्रीसोबत देखील नाना पाटेकर यांच्या नावाच्या चर्चांनी जोर धरलेला. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री आयेशा झुल्का होती…
‘जो जीता वोही सिकंदर’ या सिनेमामुळे रातोरात प्रसिद्धी मिळवलेल्या अभिनेत्री आयेशा झुल्काचं आयुष्य एखाद्या सिनेमाच्या कथेपेक्षा कमी नाही. रिपोर्टनुसार , आयेशाला 90 च्या दशकातील एक सुपरहिट अभिनेत्री मानलं जात होतं. या अभिनेत्रीच्या नावावर ‘कुर्बान’, ‘वक्त हमारा है’, ‘खिलाडी’ आणि ‘दलाल’ यांसारखे अनेक हिट सिनेमे आहेत. पण सिनेमा कारकिर्दीसोबतच आयेशा झुल्काचं वैयक्तिक आयुष्यही चर्चेत राहिलं होतं.
एका काळ असा देखील होता, जेव्हा मनिषा कोइराला हिच्यासोबत नाना पाटेकर रिलेशनशिपमध्ये होते… रिपोर्टनुसार, अनेकदा नाना पाटेकर आयेशा हिच्या घरात देखील राहिले होते… तेव्हाच, नाना आणि मनीषा यांच्या रिलेशनशिपच्या बातमीने संपूर्ण इंडस्ट्रीत खळबळ उडाली होती, पण नंतर असं काही घडलं ज्यामुळे मनीषा आतून पूर्णपणे खचून गेली. असं म्हटलं जातं की, मनीषासोबत गंभीर नात्यात असूनही नानांनी तिची फसवणूक केली. मनीषाने स्वतः नानांना आयेशा झुल्कासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं होतं.
पण, करियच्या उच्च शिखरावर असताना, आयेशा हिने एका रात्रीत झगमगत्या विश्वतून संन्यास घ्यावा लागला… तेव्हा आयेशा बॉलिवूडमध्ये सक्रिय होती, पण तेव्हा शिफ्टमध्ये काम करावं लागत होतं… अशात आयेशा हिला पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्य संभाळणं कठीण झालं होतं. हेच कारण होतं ज्यामुळे आयेशा हिने झगमगत्या विश्वाचा निरोप घेतला…
मीडीया रिपोर्टनुसार, आयेशा झुल्का हिचं लग्न बिल्डर समीर वाशीसोबत झालं असून, ती आता नवऱ्याला त्याच्या व्यवसायात मदत करते. विशेष म्हणजे, आयेशा झुल्का आणि समीर यांना मुल नाही.