नारळ पाणी की ऊसाचा रस, उष्णतेपासून कोण करते संरक्षण?

नारळ पाणी की ऊसाचा रस, उष्णतेपासून कोण करते संरक्षण?
नारळ पाणी की ऊसाचा रस, उष्णतेपासून कोण करते संरक्षण?


नारळपाणी हे उन्हाळ्यातील सुपर ड्रिंक मानले जाते, तर काहीजण उसाचा रस पिऊन आपले शरीर हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करतात. परंतु जेव्हा आरोग्याच्या स्वच्छतेचा विचार केला जातो तेव्हा उसाच्या रसापासून दूर राहणे चांगले. मात्र आपल्या भारतातील बहुतांश लोकं ही उष्णतेपासून बचाव व्हावा यासाठी उसाचा रस पितात. तज्ञांच्या मते उसाचा रस आणि नारळ पाणी उन्हाळ्यात पिणे चांगले आहे परंतु उन्हाळ्यात यापैकी कोणते पेय पिणे चांगले आहे याबद्दल लोकं अनेकदा गोंधळलेले असतात. जरी दोन्हीची चव चांगली असली तरी या बाबतीत उसाचा रस अधिकतर लोकांना आवडतो.

या लेखात आपण उसाचा रस आणि नारळाचे पाणी यापैकी आरोग्यासाठी कोणते प्रभावी आहे. तसेच दोन्ही पेय पिताना कोणती खबरदारी घ्यावी हे जाणून घेऊयात.

नारळ पाण्याचे पोषक तत्वे

एखाद्याचा रक्तदाब जर वारंवार वाढत असेल तर त्यांनी नारळ पाणी प्यावे. नारळ पाण्यात असलेले पोटॅशियम शरीरातील अतिरिक्त सोडियम बाहेर काढण्यास मदत करते. त्यात मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि मॅंगनीज सारखे आवश्यक घटक देखील असतात. तसेच नारळ पाणी हे इलेक्ट्रोलाइट्सचा समृद्ध स्रोत आहे, जे सर्व ऋतूंमध्ये शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. उन्हाळ्यात हायड्रेशनसाठी नारळ पाणी पिणे एकदम प्रभावी आहे.

नारळाचे पाणी हे अत्यंत फायदेशीर आहे कारण ते फॅटमुक्त आहे आणि त्यात व्हिटॅमिन सी देखील आहे. नारळ पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील अँटिऑक्सिडंट रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. मात्र एखाद्याला वारंवार कमी रक्तदाबाचा त्रास होत असेल तर त्यांनी तज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच नारळाचे पाणी प्यावे.

ऊसाच्या रसातील पोषक घटक

ऊसाच्या रसाला उन्हाळी सुपर ड्रिंक म्हणूनही ओळखले जाते. ज्या लोकांना मधुमेह नाहीये त्यांच्यासाठी उसाचा रस अत्यंत फायदेशीर आहे कारण त्यातील नैसर्गिक साखर, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज, त्वरित ऊर्जा प्रदान करतात. त्यात कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि जीवनसत्त्वे अ, ब-कॉम्प्लेक्स आणि क यासह अनेक अँटीऑक्सिडंट्स देखील असतात.

ऊस की नारळ पाणी

इलेक्ट्रोलाइट्सचे प्रमाण – नारळाच्या पाण्यात पोटॅशियम, सोडियम आणि मॅग्नेशियम असते, जे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित करण्यास मदत करते. घामामुळे इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन बिघडते आणि नारळाचे पाणी हे संतुलन पुन्हा स्थिर करण्यास मदत करू शकते. दुसरीकडे उसाच्या रसात अनेक खनिजे असतात परंतु इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता असते. नारळाचे पाणी हा हायड्रेशनचा सर्वोत्तम पर्याय आहे.

साखरेचे प्रमाण – उसाच्या रसात नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे ते त्वरित ऊर्जा प्रदान करते परंतु रक्तातील ग्लुकोजची पातळी देखील वाढवते. नारळाच्या पाण्यात साखर देखील असते, परंतु कमी प्रमाणात. ज्यांना नैसर्गिक साखरेचे सेवन कमी करायचे आहे आणि हायड्रेटेड राहायचे आहे त्यांच्यासाठी नारळाचे पाणी सर्वोत्तम आहे.

कॅलरीजची संख्या: वजन कमी करण्यासाठी तसेच योग्य प्रमाणत राहण्यासाठी कॅलरीजच्या सेवनावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. उसाच्या रसात भरपूर नैसर्गिक साखर असते, त्यामुळे त्यामुळे कॅलरीजचे प्रमाण वाढू शकते. वजनावर व्यवस्थित लक्ष केंद्रित करणाऱ्यांसाठी नारळ पाणी पिणे हा एक चांगला पर्याय आहे.

पचनासाठी कोणते चांगले आहे? :ऊसाच्या रसात भरपूर नैसर्गिक साखर असते म्हणून ते तुम्हाला जड वाटू शकते. दुसरीकडे, नारळ पाणी हलके असते आणि म्हणूनच ते पचनासाठी उत्कृष्ट मानले जाते. डिहायड्रेशन, अयोग्य पचन किंवा उष्णतेमुळे ग्रस्त असलेल्यांसाठी नारळ पाणी सर्वोत्तम आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *