
तुकाराम मुंढे यांनी म्हटले की, ‘मला माझ्या आईचा पाठिंबा नेहमीच मिळत आला. तिचं नेहमीच म्हणणं असायचं की, जी जबाबदारी किंवा भूमिका दिली जाईल, ती प्रामाणिकपणे आणि व्यवस्थित पार पाडावी. पूर्वी आम्ही बदल्यांच्या विषयावर चर्चा करायचो, पण आता त्यावर बोलणं थांबवलं होतं, कारण तो पूर्णपणे शासनाचा अधिकार आहे.