Headlines

नेतान्याहू यांच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे सोशल मीडियावर प्रचंड हंगामा, काय सुरु आहे नेमका वाद ?

नेतान्याहू यांच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे सोशल मीडियावर प्रचंड हंगामा, काय सुरु आहे नेमका वाद ?
नेतान्याहू यांच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे सोशल मीडियावर प्रचंड हंगामा, काय सुरु आहे नेमका वाद ?


इराणवर इस्राईल-US ने हल्ला केल्यानंतर जवळपास १५ दिवस झाले आहेत. या हल्ल्यानंतर अनेक दावे प्रतिदावे केले जात आहे. या युद्धात पहिल्याच टप्प्यात अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांच्यासह टॉपची नेतृत्वफळी संपवण्यात आली. आता त्यांचे पूत्र मोजताबा खामेनेई यांनी सूत्रे हाती घेतली आहेत.मोजताबा खामेनेई हे या हल्ल्यात जखमी झाल्याचे म्हटले जात असताना आता इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या बाबतीत एक वादगस्त व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे नेतान्याहू हे हयात आहेत का असा सवाल सोशल मीडियावर चर्चिला जात आहे.

येथे पाहा व्हिडीओ –

इराणवर अमेरिका आणि इस्राईलने संयुक्तपणे २८ फेब्रुवारी रोजी हल्ला केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांची हत्या करण्यात आली. आता त्यांच्या जागी मोजताबा खामेनेई यांची नेमणूक करण्यात आली आहे. आता मोजताबा यांचा एक संदेश जारी करण्यात आला, त्यात त्यांचा चेहरा दाखवण्यात आला नव्हता. त्यामुळे मोजताबा हे जखमी झाले आहेत असा दावा इस्राईलने केला आहे. आता इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा एक व्हिडीओ वादग्रस्त ठरला आहे. या व्हिडीओत नेतान्याहू यांच्या हातांना सहा बोटे दिसत आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ एआय जनरेट असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे नेतान्याहू यांच्यावर एआय व्हिडीओ जारी करण्याची वेळ का आली असा प्रश्न केला जात आहे.

येथे पाहा पोस्ट –

एआय व्हिडीओवरुन वाद

इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या अलिकडच्या या व्हिडिओमुळे ऑनलाइन चर्चा सुरु झाली आहे. X (पूर्वीचे ट्विटर) वर हजारो युजरनी असा दावा केला आहे की हा व्हिडीओ कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय ) वापर करून तयार केला गेला आहे. इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्धाच्या दरम्यान समोर आलेल्या या व्हिडिओच्या विरोधात ऑनलाइन चर्चा सुरु झाली आहे. या व्हिडीओ नेतान्याहू यांच्या एका हाताला सहा बोटे दिसत आहेत. त्यामुळे हा एआय व्हिडीओ असल्याचे म्हटले जात आहे. बेंजामिन नेतान्याहू यांना अशा प्रकारचा एआय व्हिडीओ जारी करण्याची का वेळ आली या विषयी आता चर्चेला पेव फुटले आहे.

येथे पाहा पोस्ट –





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *