Headlines

पाकिस्तानला गेलेल्या इराणी शिष्ठमंडळातील नेत्यांच्या डिग्रीची का होत आहे चर्चा ?

पाकिस्तानला गेलेल्या इराणी शिष्ठमंडळातील नेत्यांच्या डिग्रीची का होत आहे चर्चा ?
पाकिस्तानला गेलेल्या इराणी शिष्ठमंडळातील नेत्यांच्या डिग्रीची का होत आहे चर्चा ?


पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराणदरम्यान २१ तास चाललेली शांतता चर्चा कोणताही तोडगा न होता संपली आहे. या चर्चेसाठी अमेरिकेच्या वतीने अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी.व्हान्स, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव्ह व्हीटकॉफ, ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर , अमेरिकन सेंट्रल कमांडचे कमांडर ब्रँड कूपर सामील होते. तर इराणच्याकडून एक वरिष्ठ शिष्ठमंडळ उपस्थित होते. ज्यात परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची, संसद अध्यक्ष मोहम्मद बाकर घालीबाफ आणि वरिष्ठ मुत्सदी माजिद तख्त-रवांची सारखे अनुभवी नेते उपस्थित होते. इराणच्या नेत्यांच्या डीग्रीची चर्चा आता सर्वत्र होत आहे.

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची

अराघची हे इराणचे वरिष्ठ मुत्सदी नेते म्हटले जातात.त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी आंतरराष्ट्रीय संबंध आणि राजकीय तत्वज्ञानाशी संबंधित आहे. त्यांनी इराणच्या स्कूल ऑफ इंटरनॅशनल रिलेशनमधून ग्रॅज्युएशन केले आहे. त्यानंतर त्यांनी इस्लामिक आझाद युनिव्हर्सिटी (IAU),तेहरानमधून पॉलिटीकल सायन्समधून पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे. त्यांची डॉक्टरी युनायटेड किंगडमच्या युनिव्हर्सिटी ऑफ केंटमधून राजकीय तत्वज्ञानातून झालेली आहे.

माजिद तख्त-रवांची

पाकिस्तानला गेलेल्या  या शिष्ठमंडळात इराणच्या वतीने एक वरिष्ठ राजकीय मुत्सदी माजित तख्त-रवांची देखील सामील होते. त्यांनी साल २०२४ मध्ये इराणच्या परराष्ट्र उप-परराष्ट्र मंत्री म्हणून काम केले आहे. तर आण्विक परिषदेत महत्वाची भूमिका निभावण्यासाठी ओळखले जातात. आणि २०१९ ते २०२२ पर्यंत संयुक्त राष्ट्रात इराणचे राजदूत देखील राहिले होते. त्यांनी यूनिवर्सिटी ऑफ कंसासमधून सिव्हील इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनची डीग्री मिळवली आहे. त्यानंतर त्यांनी दुसरी मास्टर डिग्री फोर्डहम युनिव्हर्सिटीतून इंटरनॅशनल पॉलिटीकल इकॉनॉमी एण्ड डेव्हलपमेंटमध्ये केले आहे. याशिवाय माजिद तख्त – रवांची यांनी पीएचडी देखील केली आहे. त्यांनी बर्न युनिव्हर्सिटीतून पॉलिटिकल सायन्समधून पीएचडी केली आहे.

बाघेर घालिबाफ

इराणमधून इस्लामाबाद गेलेल्या नेत्यांमध्ये इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची सोबत दुसरे एक महत्वाचे नाव आहे, ते म्हणजे इराणी संसदेचे स्पीकर मोहम्मद बागेर घालीबाफ यांचे आहे. हेच इराणच्या शिष्ठमंडळाचे प्रतिनिधीत्व करत होते. त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमीची देखील खूप चर्चा होत आहे.घालिबाफ यांनी तेहरान युनिव्हर्सिटीतून ह्युमन जिओग्राफीत बॅचलर डीग्री मिळवली आहे. त्यानंतर त्यांनी तरबियात मोदारेस युनिव्हर्सिटीतून ह्युमन जिओग्राफी आणि पॉलिटिक जिओग्राफीमध्ये मास्टरची डिग्री मिळवली आहे.त्यांच्याकडे पीएचडीची डिग्री देखील आहे. तरबियात मोदारेस युनिव्हर्सिटीतून त्यांनी पॉलिटिकल जिओग्राफीत शिक्षण घेतले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *