Headlines

पाकिस्तानात सर्वात मोठा एअरस्ट्राईक, मोठ्या हल्ल्याने खळबळ; इराण-इस्रायल युद्ध सुरू असतानाच भयंकर घडलं!

पाकिस्तानात सर्वात मोठा एअरस्ट्राईक, मोठ्या हल्ल्याने खळबळ; इराण-इस्रायल युद्ध सुरू असतानाच भयंकर घडलं!
पाकिस्तानात सर्वात मोठा एअरस्ट्राईक, मोठ्या हल्ल्याने खळबळ; इराण-इस्रायल युद्ध सुरू असतानाच भयंकर घडलं!


Pakistan Afghanistan War : सध्या सुरू असलेल्या इराण-इस्रायल युद्धाचा संपूर्ण जगाने धसका घेतला आहे. या युद्धात अमेरिकेकडून इस्रायलला रसत पुरवली जात आहे. खुद्द अमेरिकेने इराणवर काही ठिकाणी हल्ले केले आहेत. इराणनेही प्रत्युत्तरादाखल इस्रायल तसेच आखाती देशातील काही अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केलं आहे. आता या युद्धात आता इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. खामेनेई यांच्या मृत्यूनंतर जगभरात संताप व्यक्त केला जात आहे. भविष्यात हे युद्ध आणखी पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असतानाच आता पाकिस्तानाची झोप उडवणारी माहिती समोर आली आहे. पाकिस्तानावर थेट एअर स्ट्राईक करण्यात आला आहे. या घटनेमुळे पाकिस्तानात सध्या तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

नेमकं काय घडलं आहे?

सध्या इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरू आहे. एकीकडे हे युद्ध सुरू असताना दुसरीकडे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातही मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. दोन्ही देश एकमेकांवर मोठे हल्ले करत आहेत. याच संघर्षादरम्यान आता अफगाणिस्तानने पाकिस्तानवर मोठा एअर स्ट्राईक केल्याचे समोर आले आहे. अफगाणिस्तानच्या लष्कराने पाकिस्तानच्या क्वेटा शहरावर हल्ला केला आहे. या शहरात पाकिस्तानी लष्कराच्या कार्यालयावर हा एअर स्ट्राईक करण्यात आला आहे. पाकिस्तानने केलेल्या कारवाईला उत्तर म्हणून अफगाणिस्तानने हा हल्ला केल्याचे बोलले जात आहे. या हल्ल्यानंतर आता पाकिस्तानही अफगाणिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे.

अफगाणिस्तानने कारवाई का केली?

पाकिस्तानकडून अफगाणिस्तानावरही हल्ले केले जात आहेत. पाकिस्तानने शनिवारी अफगाणिस्तावर हल्ले केले होते. या हल्ल्यात अफगाणिस्तानातील दहशतवादी समूहातील 352 जण ठार झाले. पाकिस्तानकडून अफगाणिस्तानविरोधात गजब लिल हक नावाने मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत पाकिस्तानने एकूण 130 सैन्य तळंदेखील उद्ध्वस्त केली आहेत. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या 26 लष्करी चौक्यादेखील ताब्यात घेतल्या आहेत. याच कारवाईविरोधात अफगाणिस्तानने हा एअरस्ट्राईक केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *