Headlines

पार्थ पवारांनी चौकशीला सामोरं जात क्लीन होऊन बाहेर पडावं! संजय राऊतांचं विधान

पार्थ पवारांनी चौकशीला सामोरं जात क्लीन होऊन बाहेर पडावं! संजय राऊतांचं विधान
पार्थ पवारांनी चौकशीला सामोरं जात क्लीन होऊन बाहेर पडावं! संजय राऊतांचं विधान


संजय राऊत यांनी विविध राजकीय मुद्द्यांवरून भाजप आणि अन्य पक्षांवर निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणावर बोलताना, हा त्यांचा अंतर्गत विषय असल्याचे राऊत म्हणाले. शरद पवार आणि त्यांचा पक्ष अद्याप महाविकास आघाडी तसेच इंडिया ब्लॉकचा सदस्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अजित पवार गटाचे नेते शरद पवारांना मार्गदर्शन करत असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

मुंडवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांना मिळालेल्या क्लीन चिटवर राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. देवेंद्र फडणवीस कायद्याचे रक्षक नसल्याचे आणि महाराष्ट्रात कायदा सर्वांसाठी समान नसल्याचे राऊत म्हणाले. पार्थ पवारांनी स्वतः चौकशीला सामोरे जाऊन आरोप दूर करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीवर बोलताना, भाजपने मुंबईत महापौर आणल्यास तो मराठी माणसासाठी ‘काळा दिवस’ असेल, असा इशारा राऊत यांनी दिला. मुंबईची अस्मिता संपवून ती उद्योगपतींच्या हातात देण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षात गद्दार गटाला उपमहापौरपद मिळेल यावरही त्यांनी टीका केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *