पुण्यात स्पा सेंटरवर धक्कादायक प्रकार, पोलीस येताच तिनं खोलीतून घेतली उडी; घटनेनं खळबळ!

पुण्यात स्पा सेंटरवर धक्कादायक प्रकार, पोलीस येताच तिनं खोलीतून घेतली उडी; घटनेनं खळबळ!
पुण्यात स्पा सेंटरवर धक्कादायक प्रकार, पोलीस येताच तिनं खोलीतून घेतली उडी; घटनेनं खळबळ!


Pune Spa Center Raid : स्पा सेंटर, ब्युटी पार्लरच्या नावाखाली अनेक ठिकाणी देहव्यापार चालवला जात असल्याच्या काही घटना समोर आलेल्या आहेत. पोलिसांनी अशा ठिकाणांवर कारवाई केलेली आहे. परंतु आता पुण्यात एक धक्कादायक आणि अजब असा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील विमाननगर या भागात चालू असलेल्या स्पा सेंटरवर पोलिसांनी धाड टाकली. पोलिसांच्या या कारवाईच्या भीतीने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तिने पोलिसांच्या भीतीमुळे थेट दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतल्याने हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आता या महिलेच्या मृत्यूला जबाबदार कोण, असा प्रश्न विचारला जात आहे.

नेमकं काय घडलं?

पुण्यातील विमाननगर परिसरात ‘द रुट्स स्पा’ नावाचे एक स्पा सेंटर आहे. या स्पा सेंटरवर कथितपणे वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी या स्पा सेंटरवर छापा टाकला. यादरम्यान, स्पा सेंटरमध्ये असलेल्या एका महिलेने तसेच या स्पा सेंटरचा व्यवस्थापक हुसेन शेख या दोघांनी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पळण्याच्या नादात त्या दोघांनीही इमारतीवरुन थेट खाली उडी मारली. त्यांनी फरार होण्याचा प्रयत्न केला.
मात्र यात तरूणीच्या डोक्याला गंभीर मार लागला. तरुणी जागेवरच रक्तबंबाळ झाली आणि तिचा मृत्यू झाला. मृत तरुणी ही 30 वर्षांची आहे. इमारतीहून खाली उडी मारल्याने स्पा व्यवस्थापकही जखमी झाला आहे.

रुग्णालयात नेण्यासाठी लागला अर्धा तास, त्यामुळेच….

दरम्यान, 30 वर्षीय महिला तसेच स्पाच्या व्यवस्थापकाने इमारतीहून उडी घेतल्यानंतर पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्या दोघांनाही रुग्णालयात नेण्यासाठी स्ट्रेचर आणले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. परंतु तोपर्यंत तरुणीचा मृत्यू झाला होता. या दोघांना रुग्णालयात नेण्यासाठी पोलिसांना साधारण 25 ते 30 मिनिटांचा कालावधी लागला. त्यामुळेही उपचारासा विलंब झाल्याचा दावा केला जात असून तरुणीच्या मृत्यूला जबाबदार कोण, असा सवाल केला जातोय.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *