
अजित पवार यांच्या विमानाचा अपघात 28 जानेवारी 2026 रोजी झाला. मुंबईहून बारामतीकडे जात असताना बारामती विमानतळाच्या अगदी जवळ अजित पवार यांच्या विमानाची अपघात झाला. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर सुरूवातीला सांगितले की, अजित पवार गंभीर जखमी आहे आणि त्यानंतर लगेचच त्यांच्या निधनाची बातमी आली. अजित पवार यांच्या अपघातानंतर मोठा संशय व्यक्त केला जात आहे. आमदार रोहित पवार आक्रमक भूमिका घेत आहेत. आज ते बारामती पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी पोहोचले. मात्र, अजूनही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. यावेळी बोलताना रोहित पवार यांनी काही आरोप केले. अजित दादांचा एफआयआर दाखल का होत नाही? जर आमचा एफआयआर बरोबर नसेल तर आमच्यावर कारवाई करा, असे आम्ही त्यांना म्हणालो. कोणालातरी वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
रोहित पवार म्हणाले की, 2 तास आम्ही पोलिसांशी चर्चा केली. मात्र, त्यांनी गुन्हा दाखल करुन घेतला नाही. अपघात झाल्यावर Accident रिपोर्ट झालाय. मात्र, त्यातील क्रिमिनल अँगल तपासला जात नाही. त्याविरोधात गुन्हा दाखल करुन घेतला करुन जात नाही. CID किंवा इतर कोणीही तपास करू द्या पण FIR दाखल करा.
आम्ही त्यांना हे पुरावे दिल्यावर अधिकारी गुन्हा दाखल करण्यासाठी सकारात्मक दिसत आहेत. अधिकाऱ्यांनी 1 तासाचा वेळ मागितला आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले. एफआयआर दाखल होत नाही म्हणजे नक्कीच यामागे कोणत्यातरी मोठ्या व्यक्तीचा हात असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले. VSR कंपनीच्या हलगर्जीपणा दिसत आहे.
मुंबईप्रमाणे बारामती पोलिसांवरही दबाव असल्याचे आम्हाला दिसून आले. यामागे कोणीतरी आहे, असेही रोहित पवार यांनी म्हटले. इथे लोक आले आहेत आणि वकीलही आले आहेत. अजित पवार इतक्या मोठ्या लोकांचे मित्र होते तर त्या मित्रांनी लक्ष घालायला हवे असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे. कबुतरे चोरीला गेल्याचा एफआयआर झाला पण अजित पवारांची एफआयआर होत नाही तर यामागे काय आहे?