Headlines

बटण दाबा, डिक्की उघडा ! या परवडणाऱ्या टॉप-5 पॉवर्ड टेलगेट सुव्ह पाहा, किंमत किती ?

बटण दाबा, डिक्की उघडा ! या परवडणाऱ्या टॉप-5 पॉवर्ड टेलगेट सुव्ह पाहा, किंमत किती ?
बटण दाबा, डिक्की उघडा ! या परवडणाऱ्या टॉप-5 पॉवर्ड टेलगेट सुव्ह पाहा, किंमत किती ?


सध्याच्या काळात पॉवर्ड टेलगेट ( ऑटोमॅटिक बूट डोअर ) प्रीमीयम फिचर राहिलेले नाही. अनेक लोकांची ही गरज बनले आहे. ही सुविधा हातात सामान असल्यानंतर सहजपणे बुट खोलणे आणि बंद करण्यास मदत करते. खासकरुन कुटुंबियांना लाँग ड्राईव्हसाठी पॉवर्ड टेल गेट सर्वात चांगले ऑप्शन म्हटले जात आहे.

2026 मध्ये अनेक किफायती सुव्ह आणि क्रॉसओव्हरमध्ये हे फिचर्स उपलब्ध झाले आहे, जे बजेट खरेदीदारांसाठी आकर्षक पर्याय उपलब्ध आहेत. येथे आपण भारताच्या 5 सर्वात स्वस्त कारची माहिती घेणार आहोत. ज्यात पॉवर्ड टेलगेट सुविधा असूनही त्यांची किंमत खूपच परवडणारी आहे. या यादीत आम्ही Renault Duster, Maruti Suzuki Victoris, Tata Curvv, MG Windsor EV आणि MG Hector ठेवले आहे. चला या संदर्भात अधिक माहिती घेऊयात…

1. Renault Duster

2026 Renault Duster ची सुरुवातीची किंमत 10.49 लाख (एक्स-शोरूम) आहे. Techno आणि त्यावरील व्हेरिएंटमध्ये पॉवर्ड टेलगेट स्टँडर्ड उपलब्ध आहे. नवीन डिझाईन, पॅनॉरमिक सनरुफ, वेंटिलेटेड सिट्स आणि मोठा 518-700 लिटर बूट स्पेस यास आकर्षक बनवत आहे. टर्बो पेट्रोल इंजिनसह दमदार परफॉर्मेन्स देते. लाँग ड्राईव्ह आणि फॅमिली युजसाठी ही बेस्ट कार आहे.

2. Maruti Suzuki Victoris

मारुती सुझुकी व्हिक्टोरिसची किंमत 10.50 लाखापासून सुरु होते. ZXi+ आणि त्यावरील व्हेरिएंटमध्ये जेस्चर कंट्रोल (Gesture Control) साठी पॉवर्ड टेलगेट मिळते. ही मिड साईज सुव्ह पेट्रोल, स्ट्राँग हायब्रिड आणि सीएनजी पर्यायासह येते. 5-स्टार सेफ्टी रेटिंग, ADAS आणि प्रीमियम इंटेरिअरसोबत मारुतीची विश्वसनीय या बजेटमध्ये या कारला प्रीमीयम फिल देते.

3. Tata Curvv

टाटा कर्व्हची किंमत 9.69 लाखापासून सुरु होते. Accomplished+ आणि त्यावरील व्हेरिएंटमध्ये कंपनीने हिला जेश्चर कंट्रोल्ड पॉवर्ड टेलगेटसह विक्री करते. सुव्ह – कुप स्टाईल, पॅनॉरमिक सनरुफ, Level-2 ADAS आणि मजबूत बिल्ड क्वालिटी Tata ची खासियत आहे. पेट्रोल, डिझेल आणि ईव्ही असा व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.त्यामुळे ही कार व्हर्सेटाईल आहे.

4. MG Windsor EV

MG Windsor EV ची किंमत 13.50 ते 18.50 लाखापर्यंत जाते. आणि BaaS प्लान सोबत ही आणखी स्वस्त मिळू शकते. याच्या Essence PRO सारख्या टॉप व्हेरिएंटमध्ये पॉवर्ड टेलगेट आहे.52.9 kWh बॅटरी सोबत 449 km रेंज, लेव्हल-2 ADAS, V2L फंक्शन आणि स्पेशियस केबिन हिला इलेक्ट्रीक लव्हर्ससाठी आयडियल बनवते. इको-फ्रेंडली होण्यासोबत ही इलेक्ट्रीक कार लो रनिंग कॉस्टसाठी ओळखली जाते.

5. MG Hector

MG Hector ची किंमत 11.99 लाखापासून सुरु होते. या सुव्हच्या Savvy Pro व्हेरिएंटमध्ये ऑटोमॅटिक पॉवर्ड टेलगेट उपलब्ध आहे. मोठे केबिन, पॅनॉरमिक सनरुफ, आय SMART कनेक्टेड टेक आणि 5/6/7 सीटर पर्यायासह Hector फॅमिली SUV च्या रुपात प्रसिद्ध आहे. कंपनीने मोठ्या इन्फोटेन्मेंट सिस्टीमसह हीची विक्री करत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *