
Gucci Premium Diapers : फॅशनच्या दुनियेत कधी काय होईल हे सांगता येत नाही. प्रत्येकजण आपापली युक्ती वापरून काहीतरी नवी फॅशन बाजारात आणण्याचा प्रयत्न करतो. सध्या मात्र सोशल मीडियावर एक फारच अजब दावा केला जातोय. गुच्ची (Gucci) या जगप्रसिद्ध फॅशन ब्रँडने तब्बल 50000 रुपयांचे डायपर बाजारात आणल्याचे बोलले जात आहे. सात डायपर असलेल्या या प्रीमियम पॅकची किंमत तब्बल 500 डॉलर्स म्हणजेच साधारण 50 हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच गुच्ची या फॅशन ब्रँडचे एक डायपर तब्बल 7 हजार रुपयांना असल्याचे म्हटले जात आहे.
डायपरची किंमत तब्बल 50000
सोशल मीडियावर हा दावा केला जात असल्याने आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. सात हजार रुपयांचे एक डायपर बाळाला घातले तर ते रडायचे थांबेल का? असा सवाल केला जातोय. तसेच या डायपर प्रीमियम पॅकची किंमत ही एखाद्या व्यक्तीच्या महिन्याच्या पगाराएवढी आहे, असंही नेटकरी मिश्किलपणे म्हणत आहेत. या डायपरमध्ये ऑरगॅनिक कॉटनचा वापर करण्यात आल्याचा दावा केला जातोय. तसेच या डायपरमध्ये अँटी बॅक्टेरियल लेअर तसेच सॉफ्ट फोन असेल असेही सांगितले जातेय.
Gucci 490 dolarlık (22 bin TL) bebek bezini satışa çıkardı. pic.twitter.com/qWOffjzJWL
— Bee Haber (@beehaber) March 31, 2026
फॅक्ट चेकमध्ये काय समोर आलं?
एका डायपर पॅकची किंमत तब्बल 50000 रुपये असल्याचा सोशल मीडियावर दावा केला जात असल्याने अनेकजण थक्क झाले आहेत. सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टनंतर आता त्यासंदर्भात फॅक्ट चेक करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार Gucci या फॅशन ब्रँडने आतापर्यंत असे कोणतेही प्रीमियम बेबी डायपर लॉन्च केलेले नाही, असे सांगण्यात आलेले आहे. कोणताही आधार नसताना लोकांनी हा दावा केल्याचे समोर आले आहे.
Gucci, 490 dolarlık (yaklaşık 21.795 TL) bebek beziyle dikkat çekti. pic.twitter.com/ou3RKTaqc3
— Punto360 (@punto360tr) March 31, 2026
चुकीच माहिती शेअर करू नये
दरम्यान, सोशल मीडियावर रोज हजारो फोटो आणि व्हिडीओ शेअर केले जातात. कोणतीही खात्री न करता नेटकरी हे फोटो, व्हिडीओ फॉरवर्ड करतात. त्यामुळे लोकांमध्ये चुकीची माहिती पसरते. म्हणूनच काहीही शेअर करताना काळजी घ्यावी, तुम्ही शेअर करत असलेल्या गोष्टी खऱ्या आहेत की नाही? ते तपासा, असे आवाहन करण्यात आले आहे.