बाबर आझमचं क्रिकेट करिअर संपलं! टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर पीसीबीकडून मोठी घोषणा

बाबर आझमचं क्रिकेट करिअर संपलं! टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर पीसीबीकडून मोठी घोषणा
बाबर आझमचं क्रिकेट करिअर संपलं! टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर पीसीबीकडून मोठी घोषणा


बाबर आझमचं क्रिकेट करिअर संपलं! टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर पीसीबीकडून मोठी घोषणाImage Credit source: PTI

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपू्र्वी पाकिस्तानने ऑस्ट्रेलियासारख्या दिग्गज संघाला टी20 मालिकेत 3-0 ने लोळवलं होतं. त्यामुळे पाकिस्तानचा आत्मविश्वास दुणावलेला होता. पण भारतीय संघाने साखळी फेरीतच त्यांना त्यांची लायकी दाखवली. त्यानंतर साखळी फेरीत इंग्लंडने पराभवाची धूळ चारली आणि स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं. त्यानंतर शेवटच्या सामन्यात श्रीलंकेला पराभूत केलं खरं पण नेट रनरेटचं गणित काही सोडवता आलं नाही. त्यामुळे स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. या निराशाजनक कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा संताप झाला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की झाली आहे. त्यामुळे आता पीसीबीकडून संघाची शस्त्रक्रिया सुरू झाली आहे. निवड समिती सदस्य अलीम दार यांना पदावरून पायउतार व्हावं लागलं आहे. आता पाकिस्तानचा दिग्गज फलंदाज बाबर आझमवरही कारवाईचा बडगा उगारला गेला आहे.

बाबर आझमची टी20 वर्ल्डप स्पर्धेतील कामगिरी निराशाजनक राहिली आहे. त्याने टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या 6 सामन्यात फक्त 91 धावा केल्या. त्यामुळे त्याला शेवटच्या सामन्यात प्लेइंग 11 मध्येही घेतलंही नाही. त्यानंतरच बाबर आझमचं संघात काही खरं नाही हे स्पष्ट झालं होतं. अखेर झालंही तसंच.. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघात मोठे बदल दिसून आले आहेत. या संघातून दिग्गज खेळाडूंचा पत्ता कापला असून नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. या संघातून बाबर आझमलाही वगळण्यात आलं आहे. यासह सईम आयुब आणि मोहम्मद नवाज यांनाही बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

बांगलादेशमध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका होणार आहेत. 11 मार्च, 13 मार्च आणि 15 मार्चला हे सामने होणार आहेत. ढाकाच्या शेर ए बांग्ला नॅशनल स्टेडियममध्ये हे सामने होणार आहेत. या मालिकेसाठी संघाची धुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीच्या खांद्यावर दिली आहे. तसेच संघात सहा अनकॅप्ड खेळाडू आहेत. अब्दुल समद, माज सदाकत, मुहम्मद गाजी गोरी, साद मसूद, साहिबजादा फरहान आणि शमायल हुसैन या नव्या खेळाडूंची नावे आहेत.

पाकिस्तानची 15 सदस्यीय टीम : शाहीन शाह आफ्रिदी (कर्णधार), अब्दुल समद, अबरार अहमद, फहीम अशरफ, फैसल अकरम, हारिस रऊफ, हुसैन तलत, माज सदाकत, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), मोहम्मद वसीम जूनियर, मुहम्मद गाजी गोरी (विकेटकीपर), साद मसूद, साहिबजादा फरहान, सलमान अली आगा आणि शमील हुसैन.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *