Headlines

बाबर आझम खोटारडा निघाला..! टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तान संघाला फसवलं, अशी झाली पोलखोल

बाबर आझम खोटारडा निघाला..! टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तान संघाला फसवलं, अशी झाली पोलखोल
बाबर आझम खोटारडा निघाला..! टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तान संघाला फसवलं, अशी झाली पोलखोल


बाबर आझम खोटारडा निघाला..! टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तान संघाला फसवलं, अशी झाली पोलखोलImage Credit source: PTI

पाकिस्तानचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार बाबर आझमची फलंदाजी पाहून डोक्यावर हात मारण्याची वेळ आहे. एकेकाळी त्याच्या फलंदाजीला बोलबाल होता. दुबळ्या संघांविरुद्ध त्याने खोऱ्याने धावा केल्या. पण आता तेही त्याच्याकडून होईना. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत तर त्याने पाकिस्तान संघाचा अपेक्षाभंग केला. असं असताना त्याचा खोटारडेपणा उघड झाला आहे. एका रिपोर्टनुसार, बाबर आझमने टी20 वर्ल्डकप खेळण्यासाठी खोटं बोललं होतं. त्याची पोलखोल या रिपोर्टमध्ये करण्यात आली आहे. आयसीसी टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळण्यासाठी बाबर आझम पूर्णपणे फिट नव्हता. त्याच्या पायाला दुखापत असल्याने चांगली कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे टी20 वर्ल्डकप स्पर्धेत त्याच्या पदरी निराशा पडली. त्याने स्पर्धेतील 5 सामन्यात फक्त 91 धावा केल्या. भारताविरुद्ध तर त्याला फक्त 5 धावा करता आल्या. त्यानंतर त्याच्या फलंदाजीचा क्रम बदलला, इतकंच काय तर सुपर 8 फेरीत तर प्लेइंग 11 पत्ता कट केला.

नेमकं काय झालं होतं?

पाकिस्तानचा पत्रकार सलीम खालिक याने केलेल्या दाव्यानुसार, बाबर आझमच्या पायाला दुखापत असतानाही टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा खेळला. बाबर आझम पूर्णपणे फिट नव्हता. त्यामुळे त्याची कामगिरी हवी तशी झाली नाही. त्यामुळे बाबर आझमला नॅशनल टी20 कपमधून आराम दिला गेला आहे. कारण त्याला पायाची दुखापत आहे. बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेतही यासाठी निवडलं नाही. डॉक्टर जावेद मुगल यांनी याबाबत कंफर्म केलं की, बाबर आझमच्या पायाला दुखापत झाली आहे आणि त्याला आरामाची गरज आहे.

बाबर आझम वारंवार फेल गेला आणि तरीही त्याला संधी दिली गेली. बिग बॅश लीग स्पर्धेतही काही खास करू शकला नव्हता. तरी त्याच्यावर विश्वास टाकला. आशिया कप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि टी20 वर्ल्डकप स्पर्धेत त्याने नांगी टाकली. या वर्षातील 7 टी20 सामन्यात 27 च्या सरासरीने 167 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा फक्त 117.6 चा आहे. तर वर्ष 2025 खेळलेल्या वनडे सामन्यात 34 च्या सरासरीने 544 धगावा केल्या. यावेळी स्ट्राईक रेट हा 77.16चा आहे. त्यामुळे बाबर आझमचं करिअर संपल्यातच जमा झालं आहे. अनुभव असला तरी त्याची बॅट काही चालत नाही. त्याला वारंवार किती संधी द्यायचा असा प्रश्नही आता विचारला जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *