Headlines

बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे ‘या’ 4 राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार, पैश्यांचा पडणार पाऊस

बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे ‘या’ 4 राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार, पैश्यांचा पडणार पाऊस
बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे ‘या’ 4 राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार, पैश्यांचा पडणार पाऊस


ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून एप्रिल महिना खूप विशेष असणार आहे. कारण या महिन्यात बुध ग्रह जलद गतीने राशी परिवर्तन करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला बुद्धिमत्ता, वाणी, व्यवसाय, तर्क आणि संपत्ती यांचा घटक मानला जातो. त्यामुळे, जेव्हा जेव्हा बुध आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या करिअर, व्यवसाय, आर्थिक परिस्थिती आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होतो. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार बुध 11 एप्रिल रोजी मध्यरात्री 1 वाजून 12 मिनिटांनी मीन राशीत प्रवेश करेल. या राशीत बुध 30 एप्रिल 2026 पर्यंत राहील. त्यामुळे बुधाचे हे गोचर 12 राशींपैकी काही राशींसाठी खूपच लाभदायक ठरू शकतो. चला तर मग कोणत्या आहेत या राशी त्याबद्दल जाणून घेऊयात.

या शुभ राशींचे भाग्य उजळेल

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी हे बुध संक्रमण अत्यंत शुभ राहील . उत्पन्नाचे नवीन स्रोत खुले होतील. तसेच बऱ्याच दिवसांपासून गुंतवणूक करण्याची योजना आखत असाल, तर हा एक अनुकूल काळ आहे. व्यावसायिकांना मोठा नफा मिळू शकतो आणि या राशींच्या लोकांची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.

मिथुन रास

बुध मिथुन राशीचा स्वामी असल्याने या गोचराचा ही रास असलेल्या लोकांच्या करिअरवर थेट सकारात्मक परिणाम होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात आणि पदोन्नतीचीही शक्यता आहे. तुमची निर्णयक्षमता सुधारेल, जे भविष्यात फायदेशीर ठरेल.

कन्या रास

बुध संक्रमणाचा काळ कन्या राशीच्या लोकांसाठी आर्थिक स्थैर्य घेऊन येईल. कन्या राशींच्या लोकांचे पैसे कुठे अडकले असतील, तर या दिवसांमध्ये ते परत मिळण्याची दाट शक्यता आहे. कौटुंबिक जीवन आनंदी राहील आणि तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते अधिक गोड होईल. भागीदारीतील कामातून आर्थिक लाभ होईल.

धनु रास

धनु राशीसाठी हा वाढलेल्या सुखसोयी आणि ऐश्वर्याचा एक उत्तम वेळ आहे. तुम्ही नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता. तसेच तुमच्या कामाच्या कामगिरीचे कौतुक होईल. चांगली बातमी मिळाल्याने घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल.

बुध ग्रहाला प्रसन्न कसे करावे?

बुध ग्रहाचे शुभ प्रभाव वाढवण्यासाठी या काळात गणपतीची पूजा करणे विशेष फायदेशीर ठरते. बुधवारी गाईला हिरवे गवत खाऊ घाला आणि ‘ॐ भूम बुधया नमः’ या मंत्राचा जप करा. यामुळे धंदा आणि बुद्धी वाढते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *