
या विमानात मऊशार आसने, मिटिंग, जेवणासाठी वेगळी जागा, किचन, मनोरंजनासाठी वेगळी खोली, अशी व्यवस्था आहे. या विमानाला एकूण 14 खिडक्या आहेत. या विमानात नेहमी ताजी हवा येईल, असा पद्धतीने त्याची रचना करण्यात आलेली आहे. म्हणूनच हे विमान सर्वांपेक्षा वेगळे असून त्याची चर्चा होत आहे.