Headlines

भररात्री कलाकेंद्रात तुफान राडा, तोडफोड केल्याने… संभाजीनगरात नेमकं काय घडलं?

भररात्री कलाकेंद्रात तुफान राडा, तोडफोड केल्याने… संभाजीनगरात नेमकं काय घडलं?
भररात्री कलाकेंद्रात तुफान राडा, तोडफोड केल्याने… संभाजीनगरात नेमकं काय घडलं?


छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील धुळे सोलापूर रस्त्यावरील थापटी तांडा येथील कला केंद्रावर मध्यरात्री जोरदार राडा झाला आहे. एका जमावाने कला केंद्रावरील खुर्च्या, काचा व इतर वस्तूंचे मोठ्या प्रमाणात केले आहे. कुलस्वामिनी कलाकेंद्रात झालेल्या या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यामुळे हे कला केंद्र बंद करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

गावकऱ्यांची कलाकेंद्र बंद करण्याची मागणी

कुलस्वामिनी कलाकेंद्रात घडलेल्या या घटनेमुळे गावकऱ्यांनी हे केंद्र बंद करण्याची मागणी केली आहे. गावकऱ्यांनी म्हटले की, कला केंद्रावर येणारे ग्राहक धिंगाणा घालत असल्यामुळे गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. यामुळे महिला व शाळकरी मुलींना त्रास सहन करावा लागत आहे. हे कला केंद्र बंद व्हावे यासाठी गावकऱ्यांनी अनेक वेळा आंदोलन केले आहे. काल जो कला केंद्रावर राडा झाला, वाद झाला, तोडफोड झाली याच्याशी गावातील लोकांचा काही संबंध नाही अशी माहितीही रजापूर, देगाव व थोपटी तांडा येथील ग्रामस्थांनी दिली आहे. आता हे कला केंद्र बंद न केल्यास आम्ही उपोषण करून असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

नेमकं काय घडलं?

या घटनेवर बोलताना कुलस्वामिनी कला केंद्राचे मालक दादाराव मुसळे यांनी म्हटले की, ‘बाहेर दोन मुलांचा वाद झाला आणि एक मुलगा कलाकेंद्र घुसला, आमच्या मॅनेजरने त्याला बाहेर काढलं. त्यानंतर बाहेरच्या काही मुलांनी त्यांचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ व्हायरल होईल त्यामुळे त्याला मारहाण देखील करण्यात आली. नंतर मारहाण झालेल्या मुलाने गावात जाऊन सांगितलं आम्हाला कला केंद्रवाल्यांनी मारहाण केली, त्यामुळे गावातल्या जमावाने येऊन आमच्या कला केंद्राची तोडफोड केली.

पुढे बोलताना दादाराव मुसळे म्हणाले की, कलाकेंद्रातील कलाकार महिलांना गावकऱ्यांनी त्रास दिला नाही, मात्र आमचे नुकसान केले. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात कला केंद्र आहे. आमच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. त्यांनी ऐकून घेतलं पाहिजे, काही गोष्टी घडल्या असतील मात्र जमावाने येऊन असं करणं कितपत योग्य आहे. कलाकारांच्या मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, त्यांच्यासाठी आम्ही हे उदरनिर्वाहाचे साधन तयार केले आहे. काही गोष्टी बाहेर जरी घडल्या तरी कला केंद्रावर येत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *