Headlines

भाईजानला त्रास देऊ नकोस… सलमानचा बॉडीगार्ड शेराची महिलेला धमकी, बॉलिवूडमध्ये खळबळ; काय आहे प्रकरण?

भाईजानला त्रास देऊ नकोस… सलमानचा बॉडीगार्ड शेराची महिलेला धमकी, बॉलिवूडमध्ये खळबळ; काय आहे प्रकरण?
भाईजानला त्रास देऊ नकोस… सलमानचा बॉडीगार्ड शेराची महिलेला धमकी, बॉलिवूडमध्ये खळबळ; काय आहे प्रकरण?


बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा कायमच चर्चेत असतो. तो कधी त्याच्या चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे चर्चेचा विषय ठरतो. सलमानसोबतचा त्याचा बॉडीगार्ड शेरा देखील सतत लाइमलाइटमध्ये असतो. शेरा उर्फ गुरमीत सिंग हा एका वेगळ्या प्रकरणामुळे चर्चेत आहे. त्याच्या विरोधात नोंदवलेला गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. आता नेमकं प्रकरण काय आहे चला जाणून घेऊया…

अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेरने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याच्याविरुद्ध नोंदवलेला गुन्हा रद्द करण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. शेरावर एका महिलेने फोन करून धमकावल्याचा गंभीर आरोप केला आहे. ही घटना २०१७ वर्षातील आहे. ही महिला ‘बिग बॉस’ शोशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

२०१७ मध्ये ‘बिग बॉस’च्या घरातून सलमान खानने एका स्पर्धकाला आक्षेपार्ह वक्तव्यामुळे बाहेर काढले होते. या स्पर्धकाला पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी एक महिला मदत करणार होती.
या महिलेच्या आरोपानुसार, तिने तक्रार करू नये म्हणून शेरने तिला फोन करून धमकावले. त्याने तिला सांगितले की, “सलमानला त्रास देऊ नकोस, तक्रार करू नकोस.” महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी शेराविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. नंतर या प्रकरणाचे आरोपपत्र (चार्जशीट) देखील दाखल करण्यात आले.

शेराची याचिका

आता शेराने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून हा गुन्हा आणि त्याचे आरोपपत्र रद्द करण्याची मागणी केली आहे. याचिकेत शेराने आपल्याविरुद्धचे आरोप फेटाळले असून, न्यायालयाकडे गुन्हा रद्द करण्याची विनंती केली आहे. ही घटना जवळपास ८ वर्ष जुनी असली तरी, ती आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मुंबई उच्च न्यायालय लवकरच या याचिकेवर सुनावणी घेणार असल्याचे समजते.

मुख्य मुद्दे:

-शेराने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली.

-महिलेला फोन करून धमकावल्याचा आरोप.

-घटना २०१७ ची, ‘बिग बॉस’ शोशी संबंधित.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *