भाजपा 28 फेब्रुवारीपर्यंत राज्यसभेची नावं जाहीर करणार?

भाजपा 28 फेब्रुवारीपर्यंत राज्यसभेची नावं जाहीर करणार?
भाजपा 28 फेब्रुवारीपर्यंत राज्यसभेची नावं जाहीर करणार?


मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) कोअर कमिटीची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांच्यासह 12 प्रमुख नेते उपस्थित होते. आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांच्या नावांवर यात सखोल चर्चा करण्यात आली.

सध्या विनोद तावडे, रामदास आठवले, रावसाहेब दानवे, प्रीतम मुंडे, विजया रहाटकर आणि भागवत कराड यांसारख्या प्रमुख नावांची चर्चा सुरू आहे. एकूण सात जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत भाजप चार जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. कोअर कमिटीमध्ये चर्चिल्या गेलेल्या या नावांचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी दिल्लीला पाठवण्यात येईल. रवींद्र चव्हाण हे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेणार असून, त्यानंतर राज्यसभेची अंतिम नावे 28 फेब्रुवारीपर्यंत जाहीर केली जातील, असे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्पष्ट झाले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *