भारताचे मोठे धाडस, हे देश खंबीरपणे रशियाच्या मागे, जगातील…

भारताचे मोठे धाडस, हे देश खंबीरपणे रशियाच्या मागे, जगातील…
भारताचे मोठे धाडस, हे देश खंबीरपणे रशियाच्या मागे, जगातील…


रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू झाले, त्यावेळी काही देशांनी रशियाला वेगळे पाडण्याचा निर्णय घेतला. कोणत्याही परिस्थितीमध्ये रशियाला अडचणीत आणण्याचा त्यांचा डाव होता. मात्र, यावेळी भारताने तो विश्वास आणि रशियाची साथ दिली. त्यानंतर रशियाच्या मागे अनेक देश ठामपणे उभी राहिली. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर मोठे निर्बंध लादण्यात आली. मात्र, तरीही भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली. आम्ही आमच्या जनतेच्या हितासाठी योग्य ती निर्णय घेऊ असे स्पष्ट शब्दात भारताने म्हटले. आम्हाला ज्यांच्याकडून तेल स्वस्त मिळेल, त्यांच्याकडून आम्ही घेणार. भारतावर प्रचंड दबाव असतानाही भारत झुकला नाही. रशियन अर्थव्यवस्था कोलमडवावी, याकरिता अनेकांनी प्रयत्न केली. मात्र, याच्या नेमके उलट झाले आणि यादरम्यान रशियाचा फायदाच फायदा झाला.

अमेरिकेकडून सातत्याने दावा केला जात आहे की, भारताने रशियाकडून जवळपास तेल खरेदी थांबवली आहे. पण आजही वस्तूस्थिती हीच आहे की, भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवली नाही. भारताच्या राष्ट्र-प्रथम दृष्टिकोनाने जगाला एक शक्तिशाली संदेश दिला. महासत्तेसमोर भारत झुकलाच नाही. भारताने दाखवलेल्या हिंमतीनंतर अनेक देश रशियाच्या मदतीला पुढे आली.

भारतावर इतका जास्त दबाव असतानाही भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली फक्त आणि फक्त त्याचे माध्यम बदलले. एक काळ असा होता जेव्हा युरोपियन युनियन रशियाविरुद्ध नवीन निर्बंध पॅकेज लागू करण्यासाठी संकेताची वाट पाहत असे. पण आता परिस्थिती बदलली आहे. त्यांनीही आता माघार घेतली.

महासत्ता देशांनी रशियाला वाळीत टाकण्याचा पूर्ण डाव टाकला होता. पण याला भारताने उधळून लावला. भारतावर अमेरिका मोठा टॅरिफ आकारत असतानाही भारताने माघार अजिबातच घेतली नाही. उलट युरोपियन युनियनसोबत महत्वपूर्ण करार भारताने केली. अमेरिका भारतावर कडक निर्बंध लावत असतानाच भारत इतर देशांसोबत महत्वपूर्ण व्यापार करार करत होता. भारतासोबत चीननेही या वाईट काळात रशियाची साथ दिल्याची वस्तूस्थिती आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *