भारत जगासाठी आशेचा किरण, सर्वात मोठ्या तिसऱ्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल, मोदींनी सांगितलं विकासाचं व्हिजन

भारत जगासाठी आशेचा किरण, सर्वात मोठ्या तिसऱ्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल, मोदींनी सांगितलं विकासाचं व्हिजन
भारत जगासाठी आशेचा किरण, सर्वात मोठ्या तिसऱ्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल, मोदींनी सांगितलं विकासाचं व्हिजन


पंतप्रधान नरेंद्र मोदी Image Credit source: टीव्ही 9 मराठी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर भाषण केले, यावेळी बोलताना भाषणाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची विकासाच्या दिशेनं कशापद्धतीने वाटचाल सुरू आहे? याबद्दल माहिती दिली, राष्ट्रपतीच्या अभिभाषणाचा उल्लेख करताना राष्ट्रपतींनी केलेल्या भाषणातून भारताच्या विकासाचा स्वर संसदेमध्ये घुमला असं मोदी यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, देश कशापद्धतीने विकास करत आहे, पुढे चालला आहे, याची चर्चा राष्ट्रपतींच्या भाषणामध्ये झाली. 21 व्या शतकाचं पहिलं क्वार्टर पूर्ण झालं आहे. आता 21 व्या शतकातील दुसरं क्वार्टर देखील विकसीत भारताच्या जडणघडणीमध्ये खूप महत्त्वाचं असणार आहे, असं यावेळी मोदी यांनी म्हटलं आहे.

भारत आज जागतिक स्थरावर जी आव्हान निर्माण झाली आहे, त्यावर समाधान शोधणारा आणि जगाला आशेचा किरण दाखवणार देश बनला आहे, भारताचा जीडीपी प्रचंड वाढला आहे, यावरून आपली अर्थव्यवस्था किती मजबूत झाली आहे, याचा अंदाज येतो, आपण ज्या गतीने पुढे जात आहोत, ते पहाता लवकरच आपण जगात तिसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था होऊ असा विश्वासही यावेळी मोदी यांनी व्यक्त केला आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, खेळ अशा सर्वच क्षेत्रामध्ये भारताची दमदार वाटचाल सुरू आहे, असं यावेळी मोदी यांनी म्हटलं आहे.

जगातील 9 मोठ्या देशांसोबत ट्रेड डील

पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे की, जग हे आज नव्या ग्लोबल ऑर्डच्या दिशेनं वाटचाल करत आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर एक वर्ल्ड ऑर्डर बनलं होतं. त्यानंतर आता नव्यानं वर्ल्ड ऑर्डर बनलं आहे, त्याचा कल हा भारताच्या बाजुने आहे. एक जागतिक मित्र म्हणून आता भारत अनेक देशांचा व्यापारामध्ये एक विश्वासू पार्टनर बनला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जगातील प्रमुख 9 देशांसोबत भारतानं ट्रेड डील केली आहे. यामध्ये मदर ऑफ ऑल डीलचा देखील समावेश आहे. या डीलमध्ये एकत्रीतरित्या 27 देशांचा समावेश आहे, विरोधकांनी देशाची स्थिती अशी बनवली होती की त्यावेळी एकही देश भारतासोबत ट्रेड डील करण्यासाठी तयार नव्हता, असं म्हणत त्यांनी यावेळी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *