Headlines

भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी कसा उचलला?, सगळा घटनाक्रम उघड

भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी कसा उचलला?, सगळा घटनाक्रम उघड
भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी कसा उचलला?, सगळा घटनाक्रम उघड


नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात याची चौकशी एसआयटीचे पथक करत आहे. आता अशोक खरात याला त्याच्या घरातून पोलिसांनी कसे उचलले याचा घटनाक्रम उघडकीस आला आहे. भोंदूबाबा खरात याच्या विरोधात महिलेच्या लैंगिक शोषणाची तक्रार आल्यानंतर पोलिसांच्या हालचालींना वेग आला. फियार्दी खरात विरोधात तक्रार देण्यास तयार होताच वरिष्ठांना तात्काळ माहिती देण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ग्रीन सिग्नल देताच पोलिस एक्शन मोडवर आले. खरातचे राजकीय आणि प्रशासकीय संबंध लक्षात घेऊन गुप्त योजना आखली गेली. तक्रारीचा ड्राफ्ट तयार करण्यात आला, त्यात खरातचे नाव टाळण्यात आले. पोलिस कर्मचाऱ्यांना केवळ बंदोबस्ताचे आदेश देण्यात आले. खरी माहीत गुप्त ठेवली. पाच स्वतंत्र पथके तयार करण्यात आली.प्लानची पूर्व कल्पना देण्यात आली नाही. सिव्हील ड्रेसमधील टीम खरातच्या घराबाहेर पूर्णवेळ उभी होती. क्राईम ब्रँच आणि गुंडा स्क्वॉडचा ऑपरेशनमध्ये सहभाग होता. संयश टाळण्यासाठी परिसरात चोर घुसला अशी अफवा पसरवण्यात आली. चोर शोधण्याच्या नावा खाली पोलिसांनी खरातच्या घरात प्रवेश मिळवला. खरात घरात असल्याची खात्री होताच वरिष्ठांना गुप्त संदेश मिळाला.क्राईम ब्रँचने तात्काळ खरातला ताब्यात घेऊन अटकेची प्रक्रिया सुरु केली. अटकेनंतर कुटुंबियांकडून गोंधळ आणि पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. कोणत्याही दबावाला न जुमानता पोलिसांनी अटकेची प्रक्रिया पूर्ण केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *