Headlines

भोंदू बाबा अशोक खरातच्या केबिनचं गूढ अखेर समोर, फक्त एका गोष्टीमुळे सत्य उलगडले

भोंदू बाबा अशोक खरातच्या केबिनचं गूढ अखेर समोर, फक्त एका गोष्टीमुळे सत्य उलगडले
भोंदू बाबा अशोक खरातच्या केबिनचं गूढ अखेर समोर, फक्त एका गोष्टीमुळे सत्य उलगडले


सध्या राज्यात भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होते आहेत. त्यातच आता अंगावर शहारा आणणारा आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अशोक खरात प्रकरणी विशेष तपास पथकाकडून (SIT) सातत्याने चौकशी केली जात आहे. त्यात काही दिवसांपूर्वी खरातच्या ओकस (Okas) कार्यालयाची पुन्हा एकदा कसून झडती घेण्यात आली आहे. या कार्यालयातील एक भयानक वास्तव पाहून अनुभवी पोलीस अधिकारीही चक्रावून गेले आहेत. या कार्यालयातून जप्त करण्यात आलेले साहित्य आणि कार्यालयाची रचनेने खरातचे काळे धंदे उघडकीस आणले आहेत.

अशोक खरात प्रकरणी विशेष तपास पथकाकडून (SIT) करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान पोलिसांच्या नजरेत सर्वात आधी खरातच्या कार्यालयातील काचांची मांडणी भरली. अशोक खरातच्या मुख्य केबिनसह संपूर्ण कार्यालयाला अत्युच्च दर्जाच्या आणि अतिगडद काळ्या रंगाच्या (Extra Dark Tinted) काचा लावण्यात आल्या होत्या. बाहेरून आतले काहीही दिसू नये, याची पुरेपूर तांत्रिक काळजी घेण्यात आली होती.

या कार्यालयातील काचा इतक्या महागड्या आणि जाड आहेत की आतील आवाजही बाहेर जात नाही, अशी रचना करण्यात आली आहे, असे प्राथमिक तपासात नमूद करण्यात आले आहे. अशोक खरात हा स्वतःला दैवी शक्ती असलेला व्यक्ती भासवून लोकांची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. यावेळी SIT च्या हाती लागलेल्या साहित्यातून धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

पोलिसांना ५ वापरलेली काडतूस आढळली

अशोक खरात आपल्याकडे येणाऱ्या भोळ्या भक्तांना घाबरवण्यासाठी नकली सापाचा वापर करायचा. लोकांचे प्रश्न सोडवण्याचे आमिष दाखवून त्यांना अत्तर, अंगठ्या, चिंचोके, मध आणि तांबे देऊन मोठ्या रक्कमेची लुबाडणूक केली जात असे. हे सर्व साहित्य आणि तांब्या पोलिसांनी जप्त केला आहे.या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, SIT आता नरबळी आणि अघोरी विद्येच्या कोनातून तपास करत आहे. यावेळी झडतीदरम्यान पोलिसांना ५ वापरलेली काडतूस आढळली आहेत. ही काडतूसं तेथे का होती आणि त्यांचा वापर कोणावर किंवा कशासाठी केला गेला, याचा तपास सुरू आहे.

पीडितांना प्रत्यक्ष घटनास्थळी (कार्यालयात) नेऊन पंचनामा करण्यात आला. यावेळी पीडितांनी खरातच्या कार्यालयातील त्या खोल्यांची माहिती दिली जिथे त्यांना अघोरी कृत्यांचा अनुभव आला होता. कार्यालयातील कॉम्प्युटर, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.

आज न्यायालयात महत्त्वाची सुनावणी

आतापर्यंतच्या तपासात SIT च्या हाती अत्यंत महत्त्वाचे आणि ठोस पुरावे लागले आहेत. आज सरकारी वकिलांकडून न्यायालयात या पुराव्यांची सविस्तर माहिती सादर केली जाण्याची शक्यता आहे. या धक्कादायक खुलासानंतर खरातच्या अडचणीत मोठी वाढ होणार असून, त्याच्या या काळ्या धंद्यात आणखी कोणाचे हात गुंतलेले आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *