मद्य पिणाऱ्या विदेशींचे लिव्हर हेल्दी, आणि न पिणाऱ्या भारतीयांना फॅटी लिव्हर कसा काय ?

मद्य पिणाऱ्या विदेशींचे लिव्हर हेल्दी, आणि न पिणाऱ्या भारतीयांना फॅटी लिव्हर कसा काय ?
मद्य पिणाऱ्या विदेशींचे लिव्हर हेल्दी, आणि न पिणाऱ्या भारतीयांना फॅटी लिव्हर कसा काय ?


पुरातन काळापासून प्रत्येक संस्कृतीत मद्यपानाला स्थान आहे. मानवाचे आणि मद्याचे नाते नेहमीच विचित्र राहिले आहे. यात संस्कृती, सामाजिक सवयी आणि शरीराची बनावट या तिघांची भूमिका मोठी असते. आपल्यातील अनेक लोक मर्यादित प्रमाणात मद्याचे सेवन करत असतात. परंतू तरीही भारतातील अनेकांना सध्या फॅटी लिव्हरची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे एक प्रश्न मनात येतो की युरोपियन लोक भारतीयांपेक्षा जास्त मद्य प्राशन करतात. मात्र त्यांना लिव्हरचे आजार कमी का ? या संदर्भात तज्ज्ञांनी आपली मते मांडली आहेत.

सोशल मीडियावरील पोस्ट काय ?

इंस्टाग्रामवर अलिकडे एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, त्यात ३७ वर्षांच्या एका इटालियन आणि ३७ वर्षांच्या एका भारतीय व्यक्तीच्या लिव्हरचा अल्ट्रासाऊंडच्या रिपोर्टची तुलना केली आहे.मात्र, आश्चर्यकारक गोष्ट अशी की जी युरोपीय व्यक्ती आठवड्यातून तीन मद्यप्राशन करत होती. त्याचे लिव्हर अधिक हेल्दी होते. तर त्या भारतीयाने कधीच मद्य पिले नव्हते, मात्र त्यांच्या लिव्हरमध्ये फॅटी लिव्हरचे बदल नजरेस येत होते. या संदर्भात डॉ. व्यास यांनी सांगितले की यामागे अनेक कारणे असू शकतात. पहिले कारण जेनेटिक्सचे आहे. ते म्हणाले की युरोपियन लोकांमध्य मद्याचे पचन करणारे एंजाईम, अल्कोहोल डिहायड्रोजन आणि एल्डिहाईडनेजची सक्रियता चांगली असते. याचा अर्थ दारुपासून तयार होणारे विषारी तत्वे त्याच्या शरीरातून लवकर बाहेर निघतात. मात्र, आशियाई लोकांत एंजाईम एवढे प्रभावी नसतात. ज्यामुळे हे हानिकारक तत्वे शरीरात जास्त काळ राहतात आणि हळूहळू बाहेर पडतात.

लाईफस्टाईलचा रोल देखील महत्वाचा

दुसरे मोठे कारण खानपानाच्या सवयीचे आहे.युरोपियन डाएटमध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट, मासे आणि सी-फूडच्या रुपात हेल्दी फॅटस ऑलिव्ह ऑईल आणि पर्याप्त प्रोटीन सामील असते. म्हणजे त्यांचा आहार संतुलित आणि पोषणाने भरपूर असतो. याच्या तुलनेत भारतीय आहारात नेहमीच रिफाईंड कार्बोहायड्रेटची प्रमाण जास्त असते. हेल्दी फॅट आणि प्रोटीन अपेक्षापेक्षा कमी असते.
हे प्रमाण लिव्हरच्या आरोग्यावर परिणाम टाकते. तिसरा महत्वाचा मुद्दा फिजिकल एक्टीव्हीटी, डॉक्टरांच्या मते त्यांचे इटालियन रुग्ण रोज ५ ते ६ किलोमीटर पायी चालायचा. आणि याशिवाय रोज ३० ते ४० मिनिटे व्यायाम देखील करायचा. भारतात मोठ्या संख्येने लोक रेग्युलर एक्सरसाईज करत नाहीत. आणि रोजचे पाच किलोमीटर देखील चालणे त्यांना शक्य नाही.

येथे व्हिडीओ पाहा –

डॉ. व्यास यांनी सांगितले की युरोपियन लोक मद्य जास्त पित असले कर त्यांची लाईफ स्टाईल संतुलित आणि सक्रीय असते. चांगले डाएट, नियमित व्यायाम आणि अनुकूल जेनेटिक यामुळे शरीराचे झालेले नुकसान लवकर भरुन निघते. मात्र जर तुमची लाईफस्टाईल असंतुलित असेल तर दारु न पिताही तुम्हाला लिव्हरशी संबंधित अडचणी वाढू शकतात.

( डिस्क्लेमर : ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा )





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *