मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक, घरातून बाहेर पडताना हे वेळापत्रक पहा

मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक, घरातून बाहेर पडताना हे वेळापत्रक पहा
मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक, घरातून बाहेर पडताना हे वेळापत्रक पहा


मध्य रेल्वेच्या प्रवाशांना रविवारी घरातून बाहेर पडताना काळजी घ्यावी लागणार आहे., कारण येत्या रविवारी ८ फेब्रुवारी मेगाब्लॉकचे नियोजन करण्यात आले आहे. या मध्य रेल्वे मुंबई डिव्हीजनवर रुळांच्या आणि लोकलच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे रेल्वेच्या लोकल उशीराने धावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.त्यामुळे लोकल गाड्यांना गर्दी असण्याची शक्यता आहे.

मुख्य मार्गावरील ब्लॉक

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार स्थानकात अप आणि डाऊन मार्गावर सकाळी १०.५५ वा. ते दुपारी ३.५५ वा. दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. मुंबईतील मुख्य मार्गावरील मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डाऊन धिम्या मार्गावर सुटणाऱ्या लोकल सकाळी १०.४८ वा. ते दुपारी ३.४५ वा. सीएसएमटी ते विद्याविहार स्थानका दरम्यान डाऊन जलद मार्गावरुन वळवण्यात येतील. त्यामुळे या लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकावर थांबा घेतील. विद्याविहारनंतर त्या पुन्हा डाऊन धीम्या मार्गावरुन धावतील.

घाटकोपर येथून अप धीम्या मार्गावरुन सीएसएमटीला जाणाऱ्या लोकल सकाळी १०.१९ वा. ते दुपारी ३.५२ वा. विद्याविहार आणि सीएसएमटी स्थानकादरम्यान अप जलद मार्गावरुन चालवण्यात येतील. यावेळी या लोकल कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकात थांबा घेतील.

हार्बर मार्ग

हार्बर मार्गावर पनवेल आणि वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजताच्या दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येईल.

हार्बरच्या लोकल बंद

पनवेलहून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या अप मार्गाच्या हार्बर लोकल सकाळी १०.३३ वा. ते दुपारी ३.४९ वा.दरम्यान आणि बेलापूर/पनवेल डाऊन मार्गावरील लोकल सकाळी ९.४५ वा.ते ३.१२ वा. दरम्यानच्या लोकल रद्द रहातील.

ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल

अप ट्रान्स – हार्बर मार्गाची पनवेलहून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या लोकल सकाळी ११.०२ ते ३.५३ वा. आणि डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील ठाणे ते पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या लोकल सकाळी १०.०१ वा. ते ३.२० वा. दरम्यान लोकल रद्द रहातील.

सीएसएमटी ते वाशी सेक्शनच्या दरम्यान ब्लॉकच्या काळात स्पेशल लोकल चालवण्यात येतील. ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या ठाणे – वाशी /नेरुळ स्थानकादरम्यान लोकल फेऱ्या चालू रहातील. पोर्ट लाईन मार्गाची लोकल चालू रहातील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *