Headlines

मराठा क्रांती मोर्चाची काळी रंगपंचमी; भाजपविरोधात नारेबाजी, 30 वर्षांनंतर पहिल्यांदाच आलेली कोणती संधी हुकली?

मराठा क्रांती मोर्चाची काळी रंगपंचमी; भाजपविरोधात नारेबाजी, 30 वर्षांनंतर पहिल्यांदाच आलेली कोणती संधी हुकली?
मराठा क्रांती मोर्चाची काळी रंगपंचमी; भाजपविरोधात नारेबाजी, 30 वर्षांनंतर पहिल्यांदाच आलेली कोणती संधी हुकली?


मराठा क्रांती मोर्चाImage Credit source: टीव्ही ९ मराठी

Solapur Mayor Opportunity: सोलापूर महापालिकेत मराठा समाजाला महापौर पदाची संधी डावलल्याने भाजपच्या स्थानिक नेत्यांविरोधात आंदोलन करण्यात आले. मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी करण्यात आली, त्याची राज्यभरात चर्चा सुरू आहे. 1993 नंतर पहिल्यांदा मराठा समाजाला महापौरपदाची संधी आली होती. मात्र भाजपच्या स्थानिक नेत्यांनी स्वत:च्या नातेवाईकांना संधी दिली असा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. आमची मागणी आहे की अडीच वर्षापैकी सभा वर्ष मराठा समाजाला महापौर पद द्यावे तसेच जिल्हा परिषदेत कुणबी मराठा समाजाला अध्यक्ष करावे. जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर सोलापूरसह राज्यभरात आंदोलन करणार असा इशारा आंदोलकांनी दिला. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

गेल्या आठवड्यातही आंदोलन

सोलापूर महानगरपालिकेचे महापौर पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटले. असे असतानाही भाजपने आपला उमेदवार या पदासाठी निवडून आणला आणि मराठा समाजावर अन्याय केल्याचा आरोप करण्यात आला होता. गेल्या आठवड्यातही मराठा क्रांती मोर्चाने आंदोलन केले होते. लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाने मतपेटीतून आपली भूमिका स्पष्ट केली तर विधानसभेतही मराठा समाजाच्या पाठिंब्यामुळेच भाजप सत्तेत आली, असा दावा करत या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी राम जाधव यांनी केली.

विनायक कोंड्याल महापौरपदी

सोलापूर महानगरपालिकेच्या 102 नगरसेवकांमध्ये काँग्रेसचे केवळ दोन नगरसेवक निवडून आले आहेत. तर भाजपचे सर्वाधिक 87 नगरसेवक निवडून आले आहेत. सेनेचे प्रियदर्शन साठे आणि एमआयएमचे तौफिक हतुरे यांनी अखेरच्या क्षणी अर्ज मागे घेतला. त्यामुळे पीठासीन अधिकाऱ्यांनी भाजपचे विनायक कोंड्याल यांची महापौरपदी बिनविरोध निवड घोषीत केली. तर ज्ञानेश्वरी देवकर या उपमहापौरपदी बिनविरोध निवडून आल्या. एमआयएमचे महापालिकेत 8 नगरसेवक आहेत. एमआयएम हा दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तो विरोधी पक्ष ठरला आहे. तर मराठा समाजाचा महापौर करण्याची संधी भाजपमुळे हिरावल्याचा आरोप करत मराठी क्रांती मोर्चा सातत्याने विविध पद्धतीने आंदोलन करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *