आज दिनांक 22 जुलै रोजी मा.आमदार कामगार नेते शशिकांत शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार ,नवी मुंबई राष्ट्रवादी कार्याध्यक्ष नितीन चव्हाणसाहेब यांच्या उपस्थितीत नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन उपायुक्त यांच्या दालनात महापालिकेने तयार करण्यात आलेल्या समान काम समान वेतन च्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली.त्या मध्ये काही त्रुटी दिसून आल्या की महापालिकेने सातव्या वेतन आयोग नुसार एकाच पदाचा उल्लेख करून प्रस्थाव तयार करण्यात आला होता.पण कामगार संघटनेने सांगितले की महापालिकेमध्ये विविध पदे कंत्राटी पध्दतीने काम करत आहेत उदा.सफाई कामगार, पंप ऑपरेटर, व्हॉल् ऑपरेटर, मीटर वाचक,पर्यवेशक, वायरमन, वाहनचालक, प्लंबर, फिटर अजून काही पदे आहेत त्यां पदना सातव्या वेतन आयोगा नुसार जी वेतन श्रेणी लागू आहे ती लागू करून सदर प्रस्थाव नगर विकास विभागाकडे सादर करण्यास कामगार प्रतिनिधीनि संमती दिली.
महापालिकेने सदर पदाचा उल्लेख करून व वेतन श्रेणी लागू करून प्रस्थाव सादर करू असे सांगितलें.
सदर मीटिंग मध्ये राष्ट्रवादी चे पदाधिकारी विशाल भिलारे, संदीप मोहिते व कामगार प्रतिनिधी संजय सुतार,चंद्रकांत चिकने, विजय राठोड,राज कदम,गणेश भंडारी,विजय बागडे इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.
संजय सुतार
कामगार प्रतिनिधी
8082347721