Headlines

‘महाराष्ट्राची हास्यजत्रे’त निर्मिती सावंत यांची धमाकेदार एण्ट्री; वनिता खरातसोबत धमाल कॉमेडी

‘महाराष्ट्राची हास्यजत्रे’त निर्मिती सावंत यांची धमाकेदार एण्ट्री; वनिता खरातसोबत धमाल कॉमेडी
‘महाराष्ट्राची हास्यजत्रे’त निर्मिती सावंत यांची धमाकेदार एण्ट्री; वनिता खरातसोबत धमाल कॉमेडी


‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ही सोनी मराठी वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेनं आणि त्यातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केलं आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम प्रेक्षकांना दर आठवड्याला खळखळून हसवतो. उत्कृष्ट लेखन, भन्नाट परफॉर्मन्स आणि कलाकारांची जबरदस्त टाइमिंग यामुळे हा शो प्रत्येक घरात आवडीने पाहिला जातो. हास्यजत्रेचा या आठवड्याचा एपिसोड प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे, कारण प्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत एक भन्नाट स्किट सादर करताना दिसणार आहेत. ‘मॅरेज फोटो अल्बम’ असं या स्किटचं नाव असून, या स्किटमध्ये निर्मिती सावंत यांच्यासोबत पृथ्विक प्रताप आणि वनिता खरात हे कलाकारही झळकणार आहेत. या तिघांनी मिळून या स्किटमध्ये अक्षरशः धमाल उडवली आहे.

निर्मिती ताईंची स्टेजवरील उपस्थिती, त्यांची अफलातून कॉमिक टाइमिंग आणि सहज अभिनय प्रेक्षकांना नेहमीच भुरळ घालतो. त्यांच्या प्रत्येक एण्ट्रीला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो. ‘मॅरेज फोटो अल्बम’ या स्किटमध्येही त्यांनी त्याच जादुई अंदाजात प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. हास्यजत्रेच्या मंचावर त्यांचा हा खास अंदाज पाहायला मिळणार आहे.

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत निर्मिती सावंत यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ज्या काळात विनोदी क्षेत्रात महिला कलाकारांची संख्या अत्यंत कमी होती, त्या काळात त्यांनी आपल्या दमदार अभिनय आणि टायमिंगच्या जोरावर एक वेगळी उंची गाठली. त्यांच्या कॉमेडीची शैली, संवादफेक आणि व्यक्तिमत्त्व आजही अनेक कलाकारांसाठी प्रेरणादायी आहे. त्या मराठीतील अग्रगण्य आणि अत्यंत मानाच्या विनोदी अभिनेत्रींपैकी एक मानल्या जातात. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम दर सोमवार आणि मंगळवारी रात्री 9 वाजता सोनी मराठीवर प्रसारित होतो.

निर्मिती सावंत यांनी ‘झिम्मा’, ‘झिम्मा 2’, ‘अगं अगं सूनबाई..’ यांसारख्या चित्रपटांमध्ये जबरदस्त भूमिका साकारल्या आहेत. ‘क्रांतिज्योती विद्यालय: मराठी माध्यम’ या चित्रपटातील छोट्याशा भूमिकेतूनही त्यांनी विशेष छाप सोडली. त्यांना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतातच. परंतु यावेळी छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी त्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात विशेष स्किट सादर करणार आहेत.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *