महाराष्ट्र हादरला! ZP शाळेतील शिक्षकच झाला भक्षक, 5 मुलींवर लैंगिक अत्याचार

महाराष्ट्र हादरला! ZP शाळेतील शिक्षकच झाला भक्षक, 5 मुलींवर लैंगिक अत्याचार
महाराष्ट्र हादरला! ZP शाळेतील शिक्षकच झाला भक्षक, 5 मुलींवर लैंगिक अत्याचार


भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील वडेगाव येथील एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घडलेली एक अत्यंत संतापजनक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या शाळेतील एका शिक्षकाने शाळेतीलच पाच लहान मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप लागला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करून आरोपी शिक्षकाला अटक केली आहे.

एक मुलीच्या धैर्यामुळे प्रकरण उघड

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अनिल राऊत असे आहे. तो गेल्या पाच वर्षांपासून वडेगाव येथील या जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होता. त्याने शाळेतील पाच अल्पवयीन मुलींवर अश्लील कृत्ये आणि लैंगिक अत्याचार केले. इतकेच नाही, तर या प्रकाराबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन मुलींना सतत भीतीत ठेवले होते. मुली या प्रकरणामुळे अत्यंत भयभीत आणि दहशतीखाली होत्या. मात्र, अत्याचार सहन न होऊन एका पीडित मुलीने धैर्य दाखवत आपल्या पालकांना संपूर्ण हकीकत सांगितली. ही माहिती ऐकून पालक हादरले आणि तात्काळ इतर पालकांना याबाबत कळवले. अधिक चौकशी केल्यावर समजले की, आरोपीने इतर मुलींनाही असाच प्रकार केला होता.

पालकांनी दिला शिक्षकाला चोप

संतप्त झालेल्या पालकांनी थेट शाळेत जाऊन आरोपी शिक्षक अनिल राऊत याला मारहाण केली. त्यानंतर पवनी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने शाळेत धाव घेतली आणि आरोपीला ताब्यात घेतले. पीडित मुलींच्या पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO Act) तसेच भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे.

तपास सुरू

पोलिसांनी सांगितले की, आरोपीने आणखी किती मुलींना लक्ष्य केले आहे, याचा तपास केला जात आहे. शाळेतील इतर मुली आणि पालकांशी बोलून अधिक माहिती गोळा केली जात आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून, शिक्षण व्यवस्थेतील अशा प्रकारांबाबत कठोर कारवाईची मागणी होत आहे. या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवले असून, बालकांच्या सुरक्षिततेबाबत शाळा आणि शिक्षण विभागाने अधिक सजग राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. पीडित मुलींना आवश्यक वैद्यकीय आणि मानसिक मदत पुरवण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *