Headlines

महिला, पॉर्न व्हिडिओ, पेन ड्राईव्हनंतर ज्योतिषी खरातचा आणखी एक धक्कादायक कारनामा उघड; छापेमारी करताच जे सापडलं त्याने…

महिला, पॉर्न व्हिडिओ, पेन ड्राईव्हनंतर ज्योतिषी खरातचा आणखी एक धक्कादायक कारनामा उघड; छापेमारी करताच जे सापडलं त्याने…
महिला, पॉर्न व्हिडिओ, पेन ड्राईव्हनंतर ज्योतिषी खरातचा आणखी एक धक्कादायक कारनामा उघड; छापेमारी करताच जे सापडलं त्याने…


महिलेच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटक असलेला स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात सक्रिय असलेला कॅप्टन अशोक खरात याच्याबाबत नवनवीन खुलासे होत आहेत. अशोक खरातवर बलात्कार व लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप करण्याच आले आहेत. त्यानंतर त्यांच्याकडील पेनड्रायव्हमध्ये 58 व्हिडीओ सापडले होते. तसेच त्याच्यावर अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा देखील नोंदवण्यात आला आहे. सध्या त्याच्या घराची कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीतून एक धक्कादायक बाब समोर आली आहे.

अशोक खरातच्या फार्म हाऊसवर छापा

बड्या राजकीय नेत्यांचे भविष्य सांगणारा स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात उर्फ कॅप्टन याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. बलात्कार प्रकरणात अटकेत असलेल्या खरातच्या मिरगाव येथील फार्म हाऊसवर नाशिक गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने रात्री उशिरा छापा टाकला. या छाप्यात पोलिसांच्या हाती शस्त्रसाठा आणि महत्त्वपूर्ण कागदपत्रे लागल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पिस्तूल आणि जिवंत काडतुसे सापडली

मिरगाव येथील फार्म हाऊसच्या झडतीदरम्यान पोलिसांना एक पिस्तूल आणि काही जिवंत काडतुसे सापडली आहेत. ती पोलिसांनी जप्त केली आहेत. या कारवाईमुळे अशोक खरातचे धाबे दणाणले असून, तपासात आणखी कोणते मोठे मासे गळाला लागतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. घरातील पस्तूल आणि काडतुसे कोणत्या कामासाठी वापरली जाणार होती असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे.

कोट्यवधींची संपत्ती

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांत अशोक खरात याने कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमा केल्याची चर्चा आहे. नाशिक शहरात त्याचा आलिशान बंगला आणि कार्यालय असून पाथर्डी परिसरात सुमारे 30 एकर जमीन असल्याचे समोर आले आहे. याशिवाय सिन्नर, ओझर विमानतळ परिसर तसेच शिर्डी येथेही त्याची मोठ्या प्रमाणात जमीन असल्याची माहिती तपासात पुढे येत आहे. एकूणच जवळपास 200 कोटी रुपयांची संपत्ती त्याने उभी केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *