मी CBI अधिकारी बोलतोय… तुम्हाला अटक करण्यात येतेय म्हणत कोट्यावधीचा चुना, पोलिसांनी थेट…

मी CBI अधिकारी बोलतोय… तुम्हाला अटक करण्यात येतेय म्हणत कोट्यावधीचा चुना, पोलिसांनी थेट…
मी CBI अधिकारी बोलतोय… तुम्हाला अटक करण्यात येतेय म्हणत कोट्यावधीचा चुना, पोलिसांनी थेट…


पुण्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. सीबीआय ऑफिसर बोलतोय… तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात येणार… असं सांगून पुण्यात ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 11 कोटींची फसवणूक करण्यात आली. अखेर या चोरट्यांना पकडण्यात सायबर गुन्हे शाखेला यश आले. हर्षद सुभाष धंतोले आणि समर्थ देशमुख या 23 आणि 24 वर्षाच्या दोघांना सायबर पोलिसांकडून अटक केली. हे अत्यंत मोठे यश आहे.  पुण्यातल्या एका ज्येष्ठ नागरिकाला सीबीआयचे अधिकारी असल्याचे सांगून डिजिटल अरेस्ट करण्यात येणार असल्याची भीती दाखवली आणि त्यांचीकडून पावणे अकरा कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी दोघांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. महत्त्वाचं म्हणजे दोघांनीही एटीएममधून पैसे काढल्यामुळे पोलिसांना या दोघांना पकडण्यात यश आल आहे.

डिजिटल अरेस्टची धमकी देत थेट उकळले इतके कोटी…

आम्ही सीबीआय मधून बोलतोय तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात येईल आणि तुमच्या कुटुंबियांनाही अटक करण्यात येईल असं सांगून दोघांनी बँक खात्यात तातडीने रक्कम जमा करण्यास सांगितलं. या भीतीपोटी ज्येष्ठ नागरिकांनी 10 कोटी 74 लाख रक्कम या दोघांच्या अकाउंटमध्ये जमा केले. मात्र काही दिवसांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसांनी सायबर चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या

शिवाजीनगरमधील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. संपूर्ण माहिती गोळा केल्यानंतर पोलिसांनी दोघांचा तपास सुरू केला. दोघांनी एटीएममधून पैसे काढल्याचे समजतात पोलिसांनी तपासाचा मार्ग बदलला. पोलिसांसाठी ही माहिती अत्यंत महत्वाची होती. पोलिसांनी तपास केला आणि थेट एटीएममध्ये असलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून ओळख पटवली.

सायबर गुन्हे रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे..

अखेर दोघांना अटक करण्यात या प्रकरणात यश मिळाले. गेल्या काही वर्षात सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळतंय. मात्र, शक्यतो सायबर गुन्हेगार लवकर पकडले जात नाहीत. हे पुणे पोलिसांचे मोठे यश असल्याचे बोलले जात आहे. सायबर गुन्हेगारांना पकडण्याचे मोठे चॅलेंज सध्या पोलिसांपुढे आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *