Headlines

मुंबईकरांनो घरातून बाहेर पडण्याआधी सावधान, मध्य रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक

मुंबईकरांनो घरातून बाहेर पडण्याआधी सावधान, मध्य रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक
मुंबईकरांनो घरातून बाहेर पडण्याआधी सावधान, मध्य रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक


मुंबईकरांना दर रविवार प्रमाणे या रविवार दि.१२ एप्रिल २०२६ रोजी मध्य रेल्वेने अभियांत्रिकी कामकाजासाठी मेगाब्लॉकचे नियोजन केले आहे. त्यामुळे लोकल गाड्या उशीराने धावणार असल्याने लोकलला गर्दी होण्याची शक्यता आहे. दर रविवारी अभियांत्रिक आणि देखभालीचे काम करण्यासाठी मेगाब्लॉकचे नियोजन केले जाते. सोमवार ते शनिवार कामकाजाच्या दिवसात लोकलची वाहतूक सुरळीत चालण्यासाठी या मेगाब्लॉकचे आयोजन केले जात असते.

रविवारी मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक

मध्य रेल्वे, मुंबई विभागात रविवार दि. १२ एप्रिल २०२६ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी उपनगरी मार्गांवर मेगा ब्लॉक परीचालीत करणार आहे.या तपशील पुढीलप्रमाणे:

मेन लाईन

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई – विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर

वेळ: सकाळी १०.५५ वा.ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ वा. ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धिम्या मार्गावरील लोकल फेऱ्या सीएसएमटी- मुंबई ते विद्याविहार दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. या लोकल ट्रेन भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे विद्याविहार येथे पुन्हा डाऊन धिम्या मार्गावर वळविण्यात येतील.त्यामुळे या लोकल करी रोड, चिंचपोकळी, मस्जिद,सँडहर्स्ट रोड येथे थांबा घेणार नाहीत.

घाटकोपर येथून सकाळी १०.१९ वाजता ते दुपारी ३.५२ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील लोकल फेऱ्या विद्याविहार ते सीएसएमटी- मुंबई दरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. या लोकल गाड्या कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील.त्यामुळे या लोकल करी रोड, चिंचपोकळी, मस्जिद,सँडहर्स्ट रोड येथे थांबा घेणार नाहीत.

हार्बर लाईन  मेगाब्लॉक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी -वांद्रे (डाऊन)

वेळ: सकाळी ११.४० वा. ते सायंकाळी ४.४० वाजेपर्यंत

चुनाभट्टी -वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (अप)

वेळ: सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.१६ वा. ते सायं.४.४७ वाजेपर्यंत वाशी -बेलापूर -पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन मार्गावरील हार्बर लोकल फेऱ्या रद्द राहतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ वा. ते सायं. ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे- गोरेगावकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द राहतील.

पनवेल – बेलापूर -वाशी येथून सकाळी ९.५३ वा. ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द राहतील.

गोरेगाव – वांद्रे येथून सकाळी १०.४५ वा. ते सायंकाळी ५.१३ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या राहतील.

ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष गाड्या चालविण्यात येतील.

हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक दरम्यान सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वे मार्गे प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *