Headlines

मुंबई इंडियन्सला जेतेपद मिळवून देणाऱ्या रोहित शर्माला नीता अंबानी ओळखू शकल्या नाहीत! कारण की.. Video

मुंबई इंडियन्सला जेतेपद मिळवून देणाऱ्या रोहित शर्माला नीता अंबानी ओळखू शकल्या नाहीत! कारण की.. Video
मुंबई इंडियन्सला जेतेपद मिळवून देणाऱ्या रोहित शर्माला नीता अंबानी ओळखू शकल्या नाहीत! कारण की.. Video


मुंबई इंडियन्सला जेतेपद मिळवून देणाऱ्या रोहित शर्माला नीता अंबानी ओळखू शकल्या नाहीत! कारण की.. Video
Image Credit source: IPL/BCCI

आयपीएल 2026 स्पर्धेसाठी आता अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. असं असताना मुंबई इंडियन्सनेही कंबर कसली आहे. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स संघाशी 29 मार्चला होणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबईचा संघ सलग तिसऱ्या वर्षी मैदानात उतरणार आहे. मागच्या दोन पर्वात मुंबई इंडियन्सने काही खास केलं नाही. पण या पर्वात सहाव्यांदा जेतेपदाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी संघ मैदानात उतरेल. कारण मुंबईचा संघ सध्या मजबूत स्थितीत दिसत आहे. सर्वच खेळाडू फिट अँड फाईन आहेत. असं असताना रोहित शर्माबाबत एक वेगळाच उत्साह संघात पाहायला मिळत आहे. त्याला कारणही तसंच आहे. माजी कर्णधार रोहित शर्मा सध्या नेटमध्ये चांगली फलंदाजी करत आहे. दुसरीकडे, त्याचा फिटनेस पाहून अनेक जण आश्चर्य व्यक्त करत आहेत. फ्रेंचायझीची मालकिन नीत अंबानी देखील रोहित शर्माला पाहून आश्चर्यचकीत झाली.

रोहित शर्मा वनडे वर्ल्डकप 2027 डोळ्यासमोर ठेवून सराव करत आहे. त्यासाठी त्याने तो फिटनेसवर काम करत आहे. त्यामुळे त्याचं बदलेलं रूप पाहून प्रत्येक जण आश्चर्यचकीत होत आहे. मुंबई इंडियन्सने एक व्हिडीओ सोशल मीडियावर खात्यावर पोस्ट केला आहे. सराव सुरू असताना नीता अंबानी त्या ठिकाणी पोहोचल्या. तेव्हा त्यांनी सर्व खेळाडूंची भेट घेतली. जेव्हा त्यांची नजर ही रोहित शर्मावर पडली तेव्हा त्याने डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. कारण काही महिन्यांपूर्वी रोहित शर्मा बऱ्यापैकी जाडजूड होता. मात्र आता रोहित शर्मा फिट अँड फाईन दिसत आहे. नीता अंबानी यांनी त्याला पाहातच म्हणाल्या की, ‘रोहित, मी तुला ओळखलंच नाही. तू एकदम एक तरूण खेळाडूसारखा वाटतो.’ हे ऐकून रोहित शर्माही हसू लागला.

रोहित शर्माने वजन कमी केलं

आयपीएलच्या मागच्या पर्वानंतर रोहित शर्माने आपल्या फिटनेसवर काम करण्यास सुरूवात केली. रोहित शर्माचा मित्र अभिषेक नायरने सांगितलं की, रोहित शर्माने फिटनेससाठी खूप मेहनत घेतली आणि वजन कमी केलं. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याच्यातला बदल दिसला होता. आता आयपीएलमध्ये बदललेल्या रूपासह उतरणार आहे. आता वजन कमी केलं असलं तरी चाहत्यांना फलंदाजीत त्याचं वजन वाढलेलं हवं आहे. त्यामुळे आता कशी कामगिरी करतो याकडे लक्ष असणार आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *