Headlines

मोठी खळबळ! दिल्ली विधानसभा परिसरात अज्ञात कार थेट आत घुसली अन्… नेमकं काय घडलं?

मोठी खळबळ! दिल्ली विधानसभा परिसरात अज्ञात कार थेट आत घुसली अन्… नेमकं काय घडलं?
मोठी खळबळ! दिल्ली विधानसभा परिसरात अज्ञात कार थेट आत घुसली अन्… नेमकं काय घडलं?


Delhi Legislative Assembly | नुकतीच दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्ली विधानसभेच्या परिसरात सुरक्षा बॅरिकेड तोडून अज्ञात कार आत घुसल्याने मोठी खळबळ उडाली. याचदरम्यान विधानसभा अध्यक्षांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीने शाई फेकल्याची माहिती मिळाली आहे. शाई फेकताच आरोपीने तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला.

सुरक्षा रक्षकांना काही हालचाल करण्याआधीच आरोपी फरार झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे विधानसभेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.

ही घटना नेमकी कुणी आणि कोणत्या उद्देशाने घडवली, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, सुरक्षेतील त्रुटी गंभीर मानल्या जात असून, प्रशासनाकडून कडक उपाययोजना करण्याची शक्यता वर्तवली केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *