
इराण अमेरिका आणि इस्त्रायलमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. आज या युद्धाचा 23 वा दिवस आहे. या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. त्यातच इराणने हे युद्ध सुरू असताना मोठा निर्णय घेतला आहे. इराणने आपल्या शत्रू राष्ट्रांसाठी होमूर्जची सामुद्रधुनी बंद केली आहे. दरम्यान होमूर्जची सामुद्रधुनी बंद केल्यामुळे जगातील अनेक देशांमध्ये मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. अमेरिकेकडून होमूर्जची सामुद्रधुनी पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर इराणला थेट इशारा दिला आहे. इराणकडे आता फक्त 48 तास बाकी आहेत, जर या दोन दिवसांमध्ये इराणने पुन्हा एकदा होमूर्जची सामुद्रधुनी सुरू केली नाही तर आम्ही इराणवर भीषण हल्ला करू असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान ट्र्म्प यांच्या या धमकीमुळे इराणच्या अडचणी वाढलेल्या असतानाच आता इराणला आणखी एक मोठा धक्का बसला आहे, तो म्हणजे जी 7 देश इराणविरोधात एकवटले आहेत.
इराणने केवळ अमेरिका आणि इस्त्रायलवरच हल्ले केले नाहीत तर इराणकडून ज्या-ज्या आखाती देशांमध्ये अमेरिकेची सैन्य तळं होती, त्या -त्या देशांवर देखील हल्ले करण्यात आले आहेत. याविरोधात आता जी 7 देशांनी पहिल्यांदाच मोठी प्रतिक्रिया दिली आहे. इराणकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये मध्य पूर्वेत मोठं नुकसान झालं आहे, याचा निषेध जी 7 देशांकडून करण्यात आला आहे. जी 7 देशांनी आखाती देशांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच इराणला गंभीर इशारा देखील देण्यात आला आहे. जी 7 देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांकडून या युद्धासंदर्भात एक स्टेटमेंट जारी करण्यात आलं आहे, त्यामध्ये इराणला गंभीर इशारा देण्यात आला आहे. या मध्ये कॅनाडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि अमेरिका या देशांचा समावेश आहे.
नेमकं काय म्हटलं?
जी 7 देशांकडून इराणकडून आखाती देशांवर सुरू असलेल्या हल्ल्यांचा निषेध करण्यात आला आहे. इराणने केलेल्या हल्ल्यांमध्ये आखाती देशांमधील बहरीन, कुवेत, कतार आणि सौदी अरेबियाचं मोठं नुकसान झालं आहे. या देशातील पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्या आहेत. याचा आम्ही निषेध करतो. असं जी 7 देशांनी म्हटलं आहे. तसेच इराणने हे युद्ध तात्काळ थांबावं अन्यथा परिणाम वाईट होतील असा इशाराही या देशांकडून इराणला देण्यात आला आहे, त्यामुळे आता चिंता वाढली आहे.