Headlines

मोठी बातमी! काँग्रेसच्या गोटात खळबळ, 7 नगरसेवकांचं थेट निलंबन; हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट कारवाई का केली?

मोठी बातमी! काँग्रेसच्या गोटात खळबळ, 7 नगरसेवकांचं थेट निलंबन; हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट कारवाई का केली?
मोठी बातमी! काँग्रेसच्या गोटात खळबळ, 7 नगरसेवकांचं थेट निलंबन; हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट कारवाई का केली?


नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसला काही ठिकाणी चांगले यश मिळाले. मात्र, निकालानंतर पक्षशिस्त भंग करत काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी भाजपला उघडपणे साथ दिल्याचे समोर आले. या प्रकरणात काँग्रेसने कठोर भूमिका घेतली असून, एकाच झटक्यात सात नगरसेवकांना निलंबित करण्यात आले आहे. यापूर्वी अंबरनाथ महानगरपालिकेतही काँग्रेसने अशीच कारवाई केली होती.

जालना महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांच्या नियुक्ती प्रक्रियेदरम्यान काँग्रेसच्या सात नगरसेवकांनी पक्षाच्या ध्येयधोरणांना बगल देत भाजपच्या उमेदवारांना मदत केल्याचे चौकशी अहवालातून उघड झाले. पक्षादेश (व्हीप) धाब्यावर बसवून भाजपला सहकार्य केल्यामुळे पक्षाची मोठी नाचक्की झाली होती.

काँग्रेस कमिटीने केली कठोर कारवाई

या गंभीर प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने कठोर कारवाई केली. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांच्या स्वाक्षरीने या सातही नगरसेवकांना पक्षातून निलंबित करण्याचा अधिकृत कार्यालयीन आदेश जारी करण्यात आला आहे.

निलंबित झालेल्या नगरसेवकांची नावे:

-फारूक सादीक तुंडीवाले

-इमरान खान आमानुल्ला खान

-फरहाना अब्दुल रऊफ अंसारी

-सुनिल अशोक बोरडे

-मयूरी दिनेश देने

-रुबीना मजीद पठाण

-अनिल अशोक तिरुखे

पक्षशिस्तीचा बडगा; काँग्रेसने दिला कडक इशारा

काँग्रेस पक्षाने या कारवाईद्वारे राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांना स्पष्ट संदेश दिला आहे. पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना कोणतीही गय केली जाणार नाही, असा कडक इशारा या निलंबन कारवाईतून देण्यात आला आहे. या सातही नगरसेवकांना पुढील आदेशापर्यंत पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. जालना महानगरपालिकेत भाजपला मदत केल्याप्रकरणी निलंबित झालेल्या या सदस्यांची पुढची राजकीय दिशा काय असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *