मोठी बातमी! भारतीय क्रिकेटर रिंकू सिंग याच्यावर मोठं संकट, वडिलांचे निधन…

मोठी बातमी! भारतीय क्रिकेटर रिंकू सिंग याच्यावर मोठं संकट, वडिलांचे निधन…
मोठी बातमी! भारतीय क्रिकेटर रिंकू सिंग याच्यावर मोठं संकट, वडिलांचे निधन…


भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू रिंकू सिंग याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रिंकू सिंग याच्या वडिलांचे निधन झाले. रिंकू सिंग टी 20 सामने खेळत असतानाच त्याला हा धक्का बसला. रिंकूचे वडील खाचंद्र सिंग मागील काही दिवसांपासून आजारी होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. रिंकूच्या वडिलांना लिव्हरचा कॅन्सर होता. वडिलांची तब्येत अधिक खराब झाल्याने तो सामना सोडून गेला होता. मात्र, आज पहाटेच त्याच्या वडिलांनी शेवटचा श्वास घेतला. ग्रेटर नोएडा येथील यथार्थ रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. 24 फेब्रुवारी रोजीच रिंकूने वडिलांची भेट घेतली आणि त्याची ही भेट शेवटची ठरली. रिंकू अनेकदा त्याच्या मुलाखतीमध्ये वडिलांबद्दल बोलताना दिसला. त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घरोघरी सिलेंडर पोहोचवण्याचे काम रिंकू सिंगच्या वडिलांनी केले. भारतीय क्रिकेट संघात रिंकूचा समावेश झाला दिवस बदलले आणि रिंकू सिंगच्या वडिलांची तब्येत खराब झाली.

बऱ्याच दिवसांपासून रिंकूचे वडील कॅन्सरशी झुंज देत होते. शेवटी आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रिंकूने वडिलांना काही दिवसांपूर्वीच महागडी एक गाडी गिफ्ट दिली होती. टी 20 सामन्यात रिंकू सिंगचा खेळ म्हणावा तसा चांगला राहिला नाही. त्यामध्येच आता महत्वाचे सामने पुढे आहेत. रिंकू सिंगचा काही महिन्यांपूर्वीच साखरपुडा झाला.

रिंकू सिंह अलीगढचा राहणारा आहे. अत्यंत कष्ट करून तो भारती क्रिकेट संघात दाखल झाला. वडिलांनी शेवटपर्यंत रिंकूचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली. बुधवारी भारतीय संघाच्या पत्रकार परिषदेत टीम इंडियाचे बॅटिंग कोच सितांशु कोटक यांनी म्हटले होते की, रिंकूच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक आहे.

वडिलांची प्रकृती सुधारल्यानंतर रिंकू परत येईल. आता वडिलांच्या निधनानंतर रिंकू सिंग टी 20 स्पर्धेत खेळणार की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. भारतीय क्रिकेट संघाला रिंकू सिंगची गरज असून पुढील सामने जिंकणे अत्यंत आवश्यक आहे. रिंकू सिंगच्या वडिलांचे निधन झाल्याचे कळताच चाहत्यांना मोठा धक्का बसला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *