म्हणून भाजपच्या बुडाला आग लागली…; सुषमा अंधारेंनी सांगितलं टिपू सुलतान वादामागंचं कारण

म्हणून भाजपच्या बुडाला आग लागली…; सुषमा अंधारेंनी सांगितलं टिपू सुलतान वादामागंचं कारण
म्हणून भाजपच्या बुडाला आग लागली…; सुषमा अंधारेंनी सांगितलं टिपू सुलतान वादामागंचं कारण


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी करत एक वादग्रस्त विधान केले. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य आणि स्वराज्याचा विचार दिला, त्याच समकक्ष कार्य टिपू सुलतान यांनी केले आहे. त्यांना महाराजांच्या बरोबरीचे स्थान दिले पाहिजे, असे वादग्रस्त विधान हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. या विधानानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेत त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. या टीकेला उत्तर देताना हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या एका जुन्या विधानाचा दाखला देत भाजपला थेट सवाल विचारला. आता यावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी खोचक सवाल विचारला आहे.

सुषमा अंधारे यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत ट्वीटरद्वारे एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये सुषमा अंधारे यांनी भाजपवर निशाणा साधला. मेट्रो दुर्घटना आणि कालचे राहुल नार्वेकरांचे प्रताप झाकण्यासाठी भाजप आता हा सो कॉल्ड ड्रामा उभा करत आहे, असा घणाघात सुषमा अंधारे यांनी केला आहे.

सुषमा अंधारेंचे ट्वीट

“छत्रपती शिवरायांचा पराक्रम एकमेव द्वितीय आहे. याबद्दल दुमतच नाही. पण काल मुलुंडला झालेल्या मेट्रो स्लॅबच्या दुर्घटनेला झाकण्यासाठी आणि राहुल नार्वेकरांचा दादागिरी करतानाचा व्हिडिओ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ साहेब यांनी शेअर केल्याने भाजपच्या बुडाला आग लागलेली आहे. एकाच वेळी मेट्रो दुर्घटना आणि नार्वेकर या दोन्ही बातम्या वरील जनतेचे लक्ष हटवण्यासाठी भाजपाला ही सगळी नौटंकी करावी लागत आहे.

भाजप कार्यकर्त्यांच्या मनात खरंच जर छत्रपती शिवरायांच्या बद्दल एवढं प्रेम आपुलकी आणि आदर असता तर आजचे पुण्यात आंदोलन केलं हे आंदोलन खूप आधी त्यांनी भगतसिंग कोषारांच्या समोर राज्यपाल भवनला केला असता. ही सगळी जी तोडफोड आहे किंवा आत्ताची जी सगळी गुंडागर्दी आहे ती कदाचित प्रशांत कोरतकरसाठी त्यांनी राखीव ठेवली असती. ज्या भाजपच्या नेते म्हणवणाऱ्या फळविसांनी छत्रपती शिवरायांच्या अवमानाबद्दल सभागृहात साधा निंदा व्यंजक ठराव मांडला नाही त्यांना खरेच आज नौटंकी करण्याचा नैतिक अधिकार आहे का?

मेट्रो दुर्घटना आणि कालचे राहुल नार्वेकरांचे प्रताप झाकण्यासाठी भाजप आत्ता हा सो कॉल्ड ड्रामा उभा करत आहे. कुठल्याही विकास काम आम्हीच केलं असं म्हणून क्रेडिट घ्यायला पुढे येणारे फडणवीस कालच्या दुर्घटनेनंतर साधं ट्विट ही करायला पुढे आले नाहीत, त्यावर आधी भाजपच्या गल्लाभरू प्रवकत्यांनी उत्तरे दिली पाहिजेत”, अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी ताशेरे ओढले.

दरम्यान मुंबईतील मुलुंड येथे शनिवारी दुपारी वडाळा-कासारवडवली मेट्रो-४ मार्गिकेच्या कामादरम्यान सुरक्षा कठड्याचा भाग कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला. तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची गंभीर दखल घेत एकनाथ शिंदे यांनी कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे यांना तात्काळ निलंबित करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, MMRDA ने संबंधित कंत्राटदारावर ५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. मुलुंड पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत ५ जणांना अटक केली आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *