
एकीकडे इराणचे युद्ध सुरु असून आज या युद्धाचा १८ दिवस आहे.दुसरीकडे क्युबावरील संकट कमी होण्याचे नाव घेत नाहीए, हा देश पुन्हा एकदा ब्लॅक आऊटच्या संकटाशी लढत आहे. अचानक सोमवारी क्युबाची राजधानी हवाना सह संपूर्ण देशाची वीज गायब झाली आणि चारी बाजूंनी अंधाराचे साम्राज्य तयार झाले. अनेक तास वीज ठप्प झाल्याने घर, रुग्णालये आणि परिवहन सेवांवर मोठा गंभीर परिणाम झाला आहे. सोमवारी झालेल्या देशव्यापी ब्लॅकआऊटमुळे सुमारे १.१ कोटी लोक अंधारात बुडाले आहेत.
वास्तविक, क्युबाच्या ऊर्जा मंत्रालयाने सोशल मीडियाला माहिती देताना सांगितले की देशातील वीजेचे ग्रीडने काम करत नाहीएत.त्यामुळे देशातील अनेक भागातील वीज गायब झाली आहे.बहुतांशी घरात पर्यायी व्यवस्था नाही. मात्र, वीज कोणत्या कारणाने गेली आहे याचे कारण मात्र सांगण्यात आलेले नाही. मंत्रालयाने म्हटले आहे की या वीज गायब होण्याच्या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.
वीज गेल्याने लोक त्रस्त –
क्युबा हा आर्थित संकटात सापडला आहे. आधीच या देशात ऊर्जा संकट मोठे आहे. येथील बहुतांशी वीज प्रकल्प जुने झाले आहेत. नियमित देखभाल न झाल्याने हे प्रकल्प वारंवार बंद पडत आहेत. त्याच तेल पुरवठा न झाल्याने संकट अधिकच मोठे झाले आहे.
क्युबावर अमेरिकेने आर्थिक प्रतिबंध लावले आहेत. ज्यामुळे अलिकडच्या वर्षात ऊर्जा संकट वाढले आहे. अमेरिकेच्या धोरणांमुळे क्युबाला आंतरराष्ट्रीय बाजारातून संपूर्ण तेल मिळत नाहीए. त्यामुळे वीजेच्या निर्मितीवर मोठा परिणाम झाला आहे.
क्युबात आर्थिक संकट –
वीज गायब झाल्याने सर्वसामान्य जनतेला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. लोकांच्या पाणी पुरवठा, मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट सेवेत व्यत्यय निर्माण झाला आहे. छोटे व्यवसाय आणि उद्योग ठप्प पडले आहेत. त्यामुळे आर्थिक नुकसान वाढत आहे.
तोपर्यंत ब्लॅकआऊटचा धोका
क्युबाच्या सरकारने आपत्कालिन उपायांतर्गत पर्यायी एनर्जी सोर्स आणि मर्यादित पुरवठ्या आधारे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. मात्र, देशाचा इंधन पुरवठा जोपर्यंत सुरळीत होत नाही तोपर्यंत ब्लॅकआऊटचा धोका कायम राहाणार असे म्हटले जात आहे. बातमीनुसार सोमवारी रात्रीपर्यंत हवानाच्या सुमारे ५ टक्क भागात वीज बहाल करण्यात यश आले आहे. त्यामुळे ४२ वीज ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मात्र अजूनही देशाच्या बहुतांश भागात अंधाराचे साम्राज्य आहे.