Headlines

‘या’ धमाकेदार ऑफरमध्ये iPhone 15 ची किंमत 39 हजार 990 रूपयांनी स्वस्त, जाणून घ्या डीलनंतरची आकर्षक किंमत

‘या’ धमाकेदार ऑफरमध्ये iPhone 15 ची किंमत 39 हजार 990 रूपयांनी स्वस्त, जाणून घ्या डीलनंतरची आकर्षक किंमत
‘या’ धमाकेदार ऑफरमध्ये iPhone 15 ची किंमत 39 हजार 990 रूपयांनी स्वस्त, जाणून घ्या डीलनंतरची आकर्षक किंमत


तुम्हाला आयफोन 15 फोन खरेदी करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप खास आहे. कारण आजच्या लेखात आयफोन 15 वर मिळत असलेल्या सूटबद्दल सांगण्यात आले आहे, ज्यामूळे तुम्ही हा फोन स्वस्तात खरेदी करू शकता. तर क्रोमाने ‘Everything Apple Sale’ सुरू केला असून, त्यात ॲपलच्या अनेक प्रोडक्टवर भरीव सवलत दिली जात आहे. हा सेल एप्रिल ते जून या कालावधीत टप्प्याटप्प्याने चालेल. तर सेलचा पहिला टप्पा 3 एप्रिल रोजी सुरू झाला असून 19 एप्रिलपर्यंत चालणार आहे. या कालावधीत आयफोन आणि मॅकबुकसारख्या ॲपल उपकरणांवर आकर्षक ऑफर्स उपलब्ध असतील. तर या धमाकेदार डीलमध्ये आयफोन 15 वर मोठी सूट उपलब्ध केली आहे,ज्यात फोनची किंमत 39 हजार 990 रूपयांनी कमी करण्यात आलेली आहे. चला तर या डीलनंतर हा फोन कोणत्या किंमतीत खरेदी करता येणार आहे ते जाणून घेऊयात.

या सेलमध्ये आयफोन 15 खूप कमी किमतीत खरेदी करता येईल. या फोनची सर्वसाधारण किंमत सुमारे 59 हजार 900 रूपये आहे, परंतु क्रोमाच्या सेलमध्ये या फोनची किंमत कमी करून 58 हजार 490 रूपये करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त यावर 1 हजार रूपयांचा बँक कॅशबॅक आणि 1 हजार 500 रूपयांची कूपन सवलत मिळत आहे, ज्यामुळे त्याची किंमत कमी होऊन 55 हजार 990 रूपये झाली आहे.

तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला 4,000 रूपयांचा एक्सचेंज बोनस आणि त्याबदल्यात 12 हजार रूपयां पर्यंतची रक्कम मिळू शकते. या सर्व ऑफर्स एकत्र केल्यास, आयफोन 15 ची किंमत फक्त 39 हजार 990 रूपयांपर्यंत कमी होऊ शकते, जी एक उत्तम डील मानली जाते.

आयफोन १५ मध्ये काय खास आहे?

आयफोन 15 मध्ये 6.1-इंचाचा उत्कृष्ट दर्जाचा सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले आहे. यात 60Hz रिफ्रेश रेट मिळतो, जो दैनंदिन वापरासाठी खूपच स्मूथ आहे. विशेष म्हणजे, हाच डिस्प्ले आयफोन 16 मध्ये सुद्धा उपलब्ध आहे. यात डायनॅमिक आयलँड फीचरसुद्धा आहे, ज्यामुळे नोटिफिकेशन्स आणि मल्टीटास्किंग सोपे होते.

आयफोन 15 मध्ये अजूनही एक पॉवरफुल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 48 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि 12 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. हाच सेटअप नवीन आयफोन 16 मध्येही आहे. हा फोन दिवसा किंवा रात्री, कोणत्याही प्रकारच्या प्रकाशात स्पष्ट फोटो काढण्यासाठी ही उत्तम आहे.

बॅटरीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास या आयफोन 15 मध्ये 20 वॅट फास्ट चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगची सुविधा आहे. 20 वॅट चार्जर वापरून हा फोन फक्त 30 मिनिटांत 50% पर्यंत चार्ज होऊ शकतो, जे दैनंदिन वापरासाठी पुरेसे आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *