Headlines

‘या’ फळांच्या बियांमध्ये आहे पोषक तत्वांचा खजिना, फेकून देण्याची अजिबात करू नका चुक

‘या’ फळांच्या बियांमध्ये आहे पोषक तत्वांचा खजिना, फेकून देण्याची अजिबात करू नका चुक
‘या’ फळांच्या बियांमध्ये आहे पोषक तत्वांचा खजिना, फेकून देण्याची अजिबात करू नका चुक


चांगल्या आरोग्यासाठी आपण आपल्या आहारात फळांचा सेवन करत असतो. तर अशावेळेस अनेकदा आपण फळं खाऊन झाल्यावर त्यांच्या बिया फेकून देतो. पण तुम्हाला माहित्ये का की काही फळांच्या बिया देखील आपल्या आरोग्य चांगले राखण्यासाठी उपयुक्त ठरतात. कारण काही बियांमध्ये चांगल्या फॅट्सपासून ते प्रथिने आणि फायबरपर्यंत तसेच अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. तर बियांचा उपयोग केवळ रोपे वाढवण्यासाठीच नाही, तर त्या चांगल्या आरोगयासाठी सेवन देखील करू शकतो. चला तर मग उत्तम आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असलेल्या काही फळांच्या बियांबद्दल जाणून घेऊयात.

निरोगी राहण्यापासून ते त्वचा आणि केसांचे आरोग्य जपण्यापर्यंत अनेक उपाय हे नैसर्गिकरित्या उपलब्ध आहेत. फक्त कधीकधी काही गोष्टींपासून वंचित असतो की यापासून कोणताचा फायदा नाही त्यामुळे आपण अनेक गोष्ट खराब म्हणून फेकून देतो. चला तर मग जाणून घेऊया की कोणत्या फळांच्या बिया खाल्ल्या जाऊ शकतात आणि त्यामध्ये किती पोषक तत्वे असतात.

कलिंगडाच्या बिया

कलिंगडाच्या बियांमध्येही भरपूर पोषक तत्वे असतात. जेव्हा कलिंगडाचे सेवन करत असतो तेव्हा त्यातील बिया फेकून देतो. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या मते कलिंगडाच्या बियांमध्ये चांगल्या प्रमाणात प्रथिने असतात. तसेच त्यात कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, झिंक, मॅंगनीज, फोलेट आणि फॅटी ॲसिड्सचा देखील स्रोत आहेत.

खरबुजाच्या बिया

भारतीय घरांमध्ये अनेकदा खरबुजाच्या गरातून बिया काढून, त्या धुवून सुकवतात. त्यानंतर या सुकलेल्या बिया मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वजण आवडीने खातात. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननुसार , त्यात प्रथिने, फायबर, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, पॉलीअनसॅचुरेटेड फॅट (चांगल्या प्रमाणात) आणि ओमेगा-6 फॅटी ॲसिड असतात.

जांभळाच्या बिया

उन्हाळा आणि पावसाळ्यात उपलब्ध होणारे जांभूळ हे फळ जवळजवळ सर्वांचेच आवडते आहे. हे हंगामी फळ पोषक तत्वांनी समृद्ध आहे, परंतु त्याच्या बिया अनेकदा फेकून दिल्या जातात. मात्र यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांच्यासाठी या जांभळाच्या बिया कितीतरी पटीने फायदेशीर आहे. कारण अनेक लोकं रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी जांभूळ पावडरचे सेवन करतात. पबमेडनुसार जांभूळाच्या बियांमध्ये अँथोसायनिन आणि फिनोलिक संयुगे यांसारखे नैसर्गिक घटक असतात. त्यात कॅल्शियम, प्रथिने आणि फ्लेव्होनॉइड्स देखील असतात.

फणसाच्या बिया

फणसाच्या बिया देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. विशेषतः उत्तर भारतात कच्चा फणसापासून भाजी बनवली जाते. पिकलेला फणसाच्या गऱ्याचे सेवन करतो. पण अनेकदा त्याच्या बिया फेकून देतो. पण या बिया देखील पोषक तत्वांचा खजिना आहेत. हेल्थलाइननुसार फणसाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, प्रथिने, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबर आणि लोह असते.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *