Headlines

युद्धभूमीतून सर्वात मोठी बातमी, इराणचा अमेरिकेला मोठा दणका, ट्रम्प बॅकफूटवर, थेट…

युद्धभूमीतून सर्वात मोठी बातमी, इराणचा अमेरिकेला मोठा दणका, ट्रम्प बॅकफूटवर, थेट…
युद्धभूमीतून सर्वात मोठी बातमी, इराणचा अमेरिकेला मोठा दणका, ट्रम्प बॅकफूटवर, थेट…


अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युद्धातून माघार घेण्याचे संकेत मिळत आहेत. परंतु त्याचवेळी आता इराणने अमेरिकेला मोठा धक्का दिला आहे. आम्ही युद्धातून माघार घेणार नसल्याचं इराणने म्हटलं आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी जपानच्या एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं की, आम्हाला कोणत्याही स्थितीमध्ये आता सिजफायर करायचं नाहीये. आम्हाला आमच्या शत्रूंना मुळापासून संपवायचं आहे. आज युद्धाचा 22 वा दिवस आहे, 22 व्या दिवशी इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी हे मोठं विधान केलं आहे. दरम्यान या युद्धात आतापर्यंत इराणचं प्रचंड नुकासन झालं आहे. आतापर्यंत हजारो इराणनी नागरिक मारले गेले आहेत. तसेच इराणच्या वायुसेनेची देखील मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे, त्यामुळे आता आम्ही सिजफायर करणार नसल्याचं इराणने म्हटलं आहे.

अब्बास अराघची यांनी अमेरिकेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अमेरिकेकडून जे दावे करण्यात येतात आणि जी सत्य परिस्थिती असते त्यामध्ये जमीन अस्मानचं अंतर असल्याचं अराघची यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी व्हिएतनाम युद्धाचं देखील उदाहारण दिलं आहे. जसं त्या युद्धात सत्य जगापासून लपवून ठेवण्यात आलं, आज देखील अमेरिकेकडून या युद्धात त्याच रणनितीचा अंवलंब केला जात आहे. जर आता तुम्ही आमच्या इंफ्रास्ट्रक्चरवर हल्ला केला तर लक्षात असून द्या, यावेळी आम्ही कोणताही संयम बाळगणार नाही, भीषण हल्ले केले जातील, रोख ठोक प्रत्युत्तर दिलं जाईल, असं धमकी यावेळी इराणने अमेरिकेला दिली आहे.

अमेरिका हे कधीच विसरू शकत नाही की व्हिएतनाम युद्धाच्या वेळी त्यांचे शेकडो सैनिक मारले गेले होते. युद्धाचा निकाल पहिल्यापासूनच स्पष्ट होता. त्यावेळी अमेरिकेनं जनरल विल्यम वेस्टमोलँडला विमानानं अमेरिकेत बोलावण्यात आलं होतं. त्याने लोकांना असा खोटा विश्वास दिला होता की, तिकडे सगळं व्यवस्थित सुरू आहे, आणि अमेरिका हे युद्ध जिंकू शकणार आहे. दरम्यान दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केला आहे की, इराणचं नौदल संपलं आहे, तर मग ते मध्य पूर्वेत आणखी युद्ध नौका का तैनात करत आहेत? असा सवालही यावेळी इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी उपस्थित केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *