Headlines

युद्धाच्या वणव्यात उत्तर कोरियात निवडणूक, हुकूमशाहा किम जोंग उनचा….धक्कादायक निकाल समोर!

युद्धाच्या वणव्यात उत्तर कोरियात निवडणूक, हुकूमशाहा किम जोंग उनचा….धक्कादायक निकाल समोर!
युद्धाच्या वणव्यात उत्तर कोरियात निवडणूक, हुकूमशाहा किम जोंग उनचा….धक्कादायक निकाल समोर!


North Korea Election : उत्तर कोरियात हुकूमशाहा किम जोंग उन याची सत्ता आहे. किम जोंग हा एकटाच संपूर्ण देशाचे धोरण ठरवतो. आता या देशात निवडणूक झाली आहे. अपेक्षेप्रमाणे या देशात पुन्हा एकदा किम जोंग उन याचीच सत्ता कायम राहिली आहे. या निवडणुकीचा निकाल तर खूपच थक्क करणार आहे. किम जोंग उन यांच्या पक्षाला तब्बल 99.93 टक्के मतं मिळाली आहेत. विशेष म्हणजे किम जोंग युनच्या पक्षाने सर्व म्हणजेच 687 जागांवर विजय मिळवला आहे. जगात एकीकडे अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यात तुफान युद्ध चालू आहे. हे युद्ध चालू असताना दुसरीकडे किम जोंग उन याने अलिकडेच जपानच्या दिशेने 10 क्षेपणास्त्र डागले होते. असे असतानाच आता किम जोंग उन पुन्हा एकदा सर्वोच्च सत्तास्थानी बसल्याने दक्षिण कोरिया, जपान तसेच इतर काही देशांची चिंता वाडली आहे.

नेमका निकाल काय लागला?

उत्तर कोरियात 15 मार्च रोजी सुप्रीम पिपल्स असेंबली या सर्वोच्च सभागृहासाठी निवडणूक झाली. एकूण 687 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. या सर्वच्या सर्व जागांवर किम जोंग उन याच्या पार्कर्स पार्टी आणि इतर युतीतील पक्षांनी जिंकल्या आहेत. या निवडणुकीत एकूण 99.1 टक्के मतदान झाले होते. यात जवळपास 99.93 टक्के मतं ही किम जोंग उन याच्या पक्षाला पडली आहेत. म्हणजेच जवळपास सर्वच्या सर्व मतं किम जोंग उनलाच मिळाली आहेत.

मतदान न करणे हा राजद्रोहाचा गुन्हा

उत्तर कोरियात विरोधी पक्षाला काहीच महत्त्व नसते. सुप्रीम पिपल्स असेंबली या सर्वोच्च सभागृहातच उत्तर कोरियात कायदे, नियम केले जातात. हुकूमशाहा किम जोंग उन हाच तिथे अशा प्रकारचे निर्णय घेतो. उत्तर कोरियात 17 वर्षावरील व्यक्तीला मतदानाचा अधिकार आहे. तिथे मतदान न करणे हा राजद्रोहाचा गुन्हा मानला जातो. तिथे सर्वच नागरिकांना मतदान करणे अनिवार्य आहे. विशेष म्हणजे चीन, रशिया येथे राहणाऱ्या उत्तर कोरियाच्या नागरिकांनाही या निवडणुकीत मतदान करता येते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *